तेलात मिसळा हा 5 रुपयांचा पदार्थ, कोंडा होईल छू-मंतर

07 December 2023

Created By : Manasi Mande

थंडीत बऱ्याच जणांना केसात कोंड्याचा त्रास होतो.

कोंडा घालवण्यासाठी बरेच जण केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतात. पण ते उपयोगी ठरतेच असं नाही.

तुम्हालाही कोंड्याची समस्या सतावत असेल तर हा सोपा, स्वस्त, घरगुती उपाय करू शकता.

 त्यासाठी फक्त नारळाचं तेल आणि कापूर यांची गरज आहे. या दोन्हींचे कॉम्बिनेशन केसांसाठी गुणकारी आहे.  

नारळाचं तेल आणि कापूरामध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात. तसेच त्यात मॉयश्चरायझिंग घटकही असतात.

नारळ तेल आणि कापूर यांचा एकत्र वापर केल्यास स्काल्पवरील फंगस, बॅक्टेरिया , खाज कमी होते.

याच्या वापरामुळे कोंडा कमी होऊन केसगळती कमी होते.

यामुळे केसांची चमक वाढते आणि केसांचा कोरडेपणाही कमी होतो.