AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्ष 2026 मध्ये शनि गुरुचा अद्भूत योग, या राशींसाठी पुढचं वर्ष आनंददायी जाणार!

नववर्ष 2026 उजाडण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यामुळे राशींचं भाग्य उजळू शकतं. तर काही राशींना थोडा फार त्रास होणार आहे. शनि गुरूच्या युतीमुळे पुढचं वर्ष काही राशींना चांगलं जाईल. चला जाणून घेऊयात लकी राशींबाबत

नववर्ष 2026 मध्ये शनि गुरुचा अद्भूत योग, या राशींसाठी पुढचं वर्ष आनंददायी जाणार!
नववर्ष 2026 मध्ये शनि गुरुचा अद्भूत योग, या राशींसाठी पुढचं वर्ष आनंददायी जाणार!Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Dec 24, 2025 | 9:51 PM
Share

2026 या नव्या वर्षासाठी अनेक संकल्प अनेकांनी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक वागण्याचा प्रयत्न निदान एक महिना तरी करेल. पण एखाद्याने चंग बांधलाच तर हा संकल्प नित्याचाच होईल. शेवटी ते तुमच्या धैर्यावर अवलंबून आहे. असं असताना दुसरीकडे संकल्प तर करू पण ग्रहांची साथ मिळणार का? असाही एक वर्ग आहे. पुढच्या वर्षात कोणता ग्रह आपल्याला साथ देईल याची गणितं अनेक जण बांधत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार गणित मांडून बघितली जात आहेत. तुम्हाला असंच वाटत असेल तर एक गणित तुमच्या राशीसाठी जुळून येते का? ते बघा. पुढच्या वर्षात गुरू आणि शनिची युती सर्वात महत्त्वाची ठरणार असल्याचं ज्योतिष सांगत आहेत. गुरू हा ग्रह सिंह राशीत, तर शनि मीन राशीत असणार आहे. तसं पाहिलं तर सिंह राशीच्या लोकांना शनिची अडीचकी सुरु आहे. तर मीन राशीच्या जातकांना साडेसाती… पण या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे एक योग तयार होत आहे. त्याचा फायदा काही राशींना होईल, असं ज्योतिषशास्त्र सांगतं..

कर्क : शनि आणि गुरूची स्थिती या राशीच्या जातकांना लाभदायी ठरणार आहे. या काळात दोन्ही ग्रहांमुळे नशिब जोरदार साथ देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. काही गोष्टी तुमच्या बाजूने झुकलेल्या दिसतील. तसेच हातात घेतलेली कामंही तुम्ही झटपट पूर्ण कराल. त्यामुळे कामाचा उरक पटापट होईल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग जुळून येईल. देशविदेशातील यात्रा घडू शकतात.

मिथुन : या राशीच्या जातकांना शनि आणि गुरूचा लाभ मिळणार आहे. या कालावधीत नोकरी धंद्यात अपेक्षित यश मिळेल. प्रगतीसह नवे आर्थिक स्रोत खुले होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कामातून फुरसत मिळणं कठीण होईल. या काळात तब्येतीकडे लक्ष ठेवा. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात सकारात्मक बदल दिसतील. केलेल्या कामात यश मिळताना दिसेल. उद्योग धंद्यात धनलाभ होऊ शकतो.

कुंभ : गुरू आणि शनिचा योग या राशीच्या जातकांसाठी सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे शनि महाराज जातांना काही तरी भक्कम देऊन जातील, असं ज्योतिष सांगतात. पण त्यासाठी मेहनत आणि काटेकोरपणा पाळणं खूपच गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. भागीदारीच्या धंद्यात चांगलं यश मिळू शकते. आर्थिक सुधारणा तुम्हाला या काळात दिसून येईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ