Jaya Bachchan: जया बच्चन यांच्या मोबाईल वॉलपेपरवर त्या दोघांचा फोटो, पण ऐश्वर्याची लेक कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचे सवाल
Jaya Bachchan: जया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओमुळे बच्चन कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सून ऐश्वर्यासोबतच्या त्यांच्या नात्याने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jaya Bachchan: बॉलिवूडमधील बच्चन कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कधी अमिताभ बच्चन, जया बच्चन यांची वक्तव्यं, तर कधी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांचा फोटो दिसत आहे. मात्र, यामध्ये त्यांची दुसरी नात आराध्या बच्चन दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
जया बच्चन यांच्या मोबाईलच्या वॉलपेपरची चर्चा
नुकत्याच एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जया बच्चन पोहोचल्या होत्या. यावेळी त्या पापाराझींशी हसत-खेळत संवाद साधताना दिसल्या. याचदरम्यान रस्त्यावर पडलेली प्लास्टिकची बाटली त्यांच्या नजरेस पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खाली वाकून ती बाटली उचलली. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं. मात्र, या व्हिडीओमध्ये आणखी एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे जया बच्चन यांच्या मोबाईलचा वॉलपेपर. व्हिडीओमध्ये जया बच्चन यांच्या फोनच्या स्क्रीनवर नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांचा फोटो दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लगेचच आराध्या बच्चनचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. जया बच्चन यांच्या फोनवर नव्या आणि अगस्त्यचा फोटो आहे, मग आराध्याचा फोटो कुठे आहे? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
आराध्या बच्चन फोटोमध्ये का नाही?
जया बच्चन यांना तीन नातवंडं आहेत. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा ही त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांची मुलं आहेत. तर आराध्या ही त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आहे. बच्चन कुटुंबातील हे तिन्ही नातवंडं अनेकदा कौटुंबिक कार्यक्रम आणि सण-समारंभांमध्ये एकत्र दिसतात. मात्र, जया यांच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर आराध्या दिसत नसल्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. बच्चन कुटुंबातील नातेसंबंधांबद्दलही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, याआधीही ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील कथित मतभेदांबाबत अनेकदा चर्चा रंगल्या आहेत.
