AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Tragedy : विहीर खोदताना घात कसा झाला? शेवटच्या क्षणी कामगारांसोबत काय घडलं? चौकशीतून उलगडा होणार

Pandharpur Tragedy : पंढरपुरात विहीर खोदताना कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं आहे. आता या दुर्घटनेची चौकशी होणार आहे.

Pandharpur Tragedy : विहीर खोदताना घात कसा झाला? शेवटच्या क्षणी कामगारांसोबत काय घडलं? चौकशीतून उलगडा होणार
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 10:09 AM
Share

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील विहीर दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. या तिघांचा मृतदेह शोधण्यास एनडीआरएफच्या टीमला यश आलं. आता प्रशासनाने विहिरीतून तिघांचे मृतदेह यशस्वीरित्या बाहेर काढले आहेत. या दुर्घटनेची समिती स्थापन करून चौकशी होणार आहे. त्यामुळे विहीर खोदताना कामगारांसोबत नेमकं काय घडलं, याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे विहीर दुर्घटनेची संपूर्ण माहितीचा उलगडा होणार आहे.

सपंढरपूरच्या विहीर दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धू घाडगे आणि तानाजी घोडके असे तीन मृतदेह काढण्यास प्रशासनाला यश आलं आहे.  जवळपास 22 तासानंतर तिसरा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. आता चौथा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या विहीर दुर्घटनेची समिती स्थापन करून चौकशी होणार आहे. प्रथमदर्शनी ब्लास्टिंगमुळे ही दुर्घटना घडली असावी, असं बोललं जात आहे. दुर्घटनेनंतर शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडाची तपासणी करून ब्लास्टिंगमध्ये कुठले केमिकल वापरले, याचाही उलगडा होणार आहे. जिल्ह्यातील अशा पद्धतीने काम सुरू असलेल्या विहिरींचे प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती  सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. तसेच चोवीस तासांहून अधिक काळ जिल्हाधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून बचाव कार्यात सहभागी होणार आहे.

या दुर्घटना प्रकरणातील घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे. या शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडांची तपासणी करून त्यावर असणाऱ्या केमिकलची ही तपासणी होणार आहे. तसेच विहीर खोदताना केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगची परवानगी घेऊनच विहीर खोदावी, असे आव्हान सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी दिली.

Follow Us
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा