Rohit Sharma: मालिकेत फेल म्हणूुन राजीव शुक्लांनी रोहितची मैदानात घेतली शाळा, हिटमॅनचा चेहराच पडला, पाहा Video
IND vs NZ ODI Series: भारतीय संघाने सामना जिंकला आणि परिणामी ३-१ ने मालिका जिंकली. या विजयानंतर सगळे आनंदी होते पण ज्याच्यासाठी ही मालिका अतिशय खराब गेली तो रोहित शर्मा मात्र निराश होता. याचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्ताय भारतीय संघाने किवी संघाला पराभवाचा धक्का दिला. किवीचा संघ २२ धावांनी पराभूत झाला. टीम इंडियाने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १८७ धावांवर बाद झाली. यामुळे भारतीय संघाने सामना जिंकला आणि परिणामी ३-१ ने मालिका जिंकली. या विजयानंतर सगळे आनंदी होते पण ज्याच्यासाठी ही मालिका अतिशय खराब गेली तो रोहित शर्मा मात्र निराश होता. याचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.
खरं तर हा दौरा रोहित विराटसाठी अतिशय दुख:द स्वप्नासारखा होता. कारण दोघांची बॅट या मालिकेत विशेष चालली नाही. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा हा न्यूझीलंडमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. रोहित पहिल्या वनडे सामन्यात शून्यावर बाद, दुसऱ्या वनडे सामन्यात २३ धावांवर बाद, तर तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. चौैथ्या वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला. पाचव्या वनडे सामन्यात सात धावांवर बाद झाला. यामुळे चार डावांमध्ये फक्त त्याला ३० धावा केल्या. यामुळे या दौऱ्यात रोहित खऱ्या अर्थाने पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. रोहितच्या पाठोपाठ विराट कोहलीची बॅटही या दौऱ्यात पूर्णपणे शांत होती. विराटने पहिल्या वनडेत फक्त ७४ धावा केल्या . यानंतरप ७,०,५ इतक्याच धावा केल्या. म्हणजेच संपूर्ण मालिकेत विराटला ८६ धावा करता आलेल्या आहेत.
ROHIT SHARMA SHOWED LOVE ❤️🫶
As fans chanted “MUMBAI CHA RAJA”, Rohit Sharma warmly acknowledged their love and greeted them with a smile. ❤️
– MUTUAL RESPECT AND LOVE! 🥹 https://t.co/fkFpcDTyl7
— Mukku (@Cric_Mukku) November 15, 2026
या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आलेली नसल्याने रोहित शर्मा फार निराश दिसत होता. रोहितचा चेहराही पडलेला पाहायला मिळाला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याशी बोलला यानंतर रोहित फार निराश दिसला. संभाषण संपताच तो डगआऊटच्या दिशेने जाताना दिसला. यावेळी चाहत्यांनी त्याचा पडलेला चेहरा पाहून त्याला चिअर करायला सुरुवात केली, मुंबईचा राजा अशी घोषणा करायला सुरुवात केली, अशा घोषणा ऐकताच रोहितच्या चेहऱ्यावर हसू आले. त्यानी खाली घातलेली मान वरती केली आणि हसू लागला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
