AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhath Puja 2026 : इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल, तर मी..राज ठाकरेंना ओपन चॅलेंज देणारा पंडित सुनील शुक्ला कोण?

Chhath Puja 2026 : काल सगळ्या देशात उत्साहात छठ पूजा संपन्न झाली. पण मुंबई-महाराष्ट्रात मात्र छठ पूजेवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. मनसेला या वादात खेचण्याचा प्रयत्न झाला. छठच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राज ठाकरेंचं नाव घेण्यात आलं.

Chhath Puja 2026 : इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल, तर मी..राज ठाकरेंना ओपन चॅलेंज देणारा पंडित सुनील शुक्ला कोण?
Raj Thackeray
| Updated on: Nov 16, 2026 | 9:52 AM
Share

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात छठ पूजेवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, खासकरुन मुंबईत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या वादात खेचण्याचा प्रयत्न झाला. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थोडी संयमाची भूमिका घेतली. मात्र, तरीही राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी छठ पूजेच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सुनील शुक्ला म्हणाले की, “एक वर्षापूर्वी राज ठाकरे बोलले होते की, ज्याला मराठी बोलता येत नाही, त्याच्या कानाखाली मारा. त्यानंतर मी सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांच्याविरोधात केस केली. कारण माझा समाज मार खाण्यासाठी इथे आलेला नाही”

“इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल, तर मी सुनील शुक्ला मध्ये उभा दिसेल. हा समाज झुकणार नाही. जे लोक इथे कायमस्वरूपी राहणारे आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, पुढे संघर्ष खूप जास्त होणार आहे. एकत्र या जेणेकरून आपण ताकद दाखवून देऊ की महाराष्ट्रात काय करू शकतो” असं सुनील शुक्ला बोलले. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेची काय भूमिका आहे ते लवकरच समजेल.

चांदिवली विधानसभेत छटपूजा उत्साहात साजरी

चांदिवली विधानसभेत छटपूजा उत्साहात साजरी झाली. आमदार दिलीप मामा लांडे यांचा उत्तर भारतीय पेहरावाची चर्चा झाली. शितल तलाव येथे छटपूजेनिमित्त मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधवांनी एकत्र येत छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृतीनुसार दरवर्षी रामनवमी, कावड यात्रा आणि छटपूजा सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार अशी प्रतिक्रिया दिलीप मामा लांडे यांनी दिली.

सोनू सूद यांचाही विशेष सन्मान

शिवसेना नेते संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटतर्फे जुहू चौपाटीवर 29 व्या भव्य छठपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते तसेच शेखर सुमन, सोनू सूद आणि तमन्ना भाटिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि टेलिव्हिजन होस्ट शेखर सुमन यांना कला आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘‘बिहार गौरव’’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच, बिहारमध्ये आलेल्या भीषण पुराच्या काळात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन माणुसकी आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी