Maharashtra Election News LIVE : पुण्यात दोन्ही NCP मध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही- संजय राऊत
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार असून दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. ताज्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समिती आज पुन्हा बैठक
सकाळी 11 वाजता भाजप – सेना नेत्यांची रंगशारदा येथे संयुक्त बैठक. जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराच्या स्ट्रॅटर्जीवर चर्चा पार पडणार. जवळपास 10-15 जागांवर उमेदवार अदलाबदल आणि देवाणघेवाण केला जाणार
-
मनसेच्या नेत्यांची आज 11 वाजता शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांनी बोलवली बैठक
बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या सोबत निवडणुकीत अडलेल्या चार जागांवर चर्चा होणार. निवडणूक campaign आणि सभा रॅली बाबत देखील या बैठकीत आढावा घेतला जाणार. लढवल्या जाणाऱ्या जागांचा विषय आज पूर्णपणे संपवला जाणार
-
-
सटाणा शहरात भीषण अपघाताची घटना
खडीने भरलेला भरधाव ट्रक थेट दुकानात घुसला. साक्री–शिर्डी महामार्गावरील परिसरात अपघात. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दुकानाचे मोठे नुकसान; परिसरात खळबळसुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
-
संजय राऊतांचा अत्यंत मोठा दावा
आमचे नुकसान होत असतानाही आम्ही शरद पवारांना जागा देत होतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.
-
आम्ही आमच्या सीटिंग जागा दिल्या- संजय राऊत
शरद पवार आमच्यासोबत असावेत, ही आमची सर्वांची भावना असल्याचे नुकताच संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या सीटिंग जागा दिल्याचेही त्यांनी म्हटले.
-
-
कल्याण–डोंबिवलीत ठाकरे आणि मनसे युतीचा फॉर्म्युला ठरला
कल्याण–डोंबिवलीत ठाकरे आणि मनसे युतीचा फॉर्म्युला ठरला. महानगरपालिकेसाठी 122 पैकी 54 जागांवर मनसे, तर ठाकरे गट 68 जागांवर लढणार आहे. शंभर टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे.
भाजप–शिवसेना महायुती ही स्वतःच्या ओझ्याने पडणार, युतीत प्रवेश केलेल्या लोकांना कसा न्याय देणार? जागावाटपानंतर ठाकरे गटाने महायुतीवर टीका केली आहे.
-
मालेगाव महापालिका निवडणूक मनसे, शिवसेना (UBT) एकत्र लढवणार
मालेगाव महापालिका निवडणूकत मनसे, शिवसेना (UBT) एकत्रित लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, मनसे, शिवसेना (UBT), माकप (CPM) यांची संयुक्त बैठक झाली. आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय, आघाडीतून लढणाऱ्या 25 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
-
-
अमोल कोल्हे यांनी घेतली अजित पवारांची भेट
काल युतीची चर्चा फिस्कटली, आज अमोल कोल्हे यांनी घेतली अजित पवार यांची भेट. जिजाई बंगल्यावर दोघांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागपूर महापालिकेकडून मतदार जागृती
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागपूर महापालिकेकडून मतदार जागृती करण्यात येत आहे. शहरातील 335 ठिकाणी जागरूकता फलक लावले जाणार असून त्यासाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे.
“भाऊ असेल तू खरा नागपुरी तर वोट करना बहुत जरुरी”, “थांबणार नाही मतदान करणारच”, असे वेगवेगळे आशय घेऊन अगदी नागपुरी शैलीत हे हे होर्डिंग बनवण्यात आले आहेत. होर्डिंग बॅनर, स्टिकर, बॅचेस, जिंगल, बस स्टिकर्स, सेल्फी पॉईंट स्क्रीन द्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन केले जात आहे.
-
उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे, वादग्रस्त बॅनरने खळबळ
उत्तर भारतीय सेनेने सेना भवनासमोर पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर लावला आहे. उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे #बीएमसी, असे या बॅनरवर लिहीण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बॅनरद्वारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना उत्तर देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक भाजपा नेतृत्वाने वारंवार बैठका घेऊन, युतीच्या जागावाटपाची घोषणा करताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालेगावात काँग्रेस व एमआयएमची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाने एमआयएमची आघाडी रद्द झाली असून काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते , आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून ते तपोवन परिसरात झाडांची पाहणी करणार आहेत. तर दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजनव, क्रीडा, राजकारण या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Published On - Dec 27,2025 9:02 AM
