Maharashtra Municipal Elections: कार्यकर्त्यांच्या नशिबी सतरंजी? महापालिका निवडणुकीत घराणेशाही, कुटुंबातील सदस्यांसाठी जोरदार लॉबिंग
महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून येणार आहे. नगरपरिषद निवडणुकीप्रमाणेच अनेक नेते आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. मुंबई आणि कोल्हापूरमधील प्रमुख नेत्यांनी मुला-मुलींसाठी तसेच सुनांसाठी लॉबिंग सुरू केले आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा पॅटर्न दिसण्याची शक्यता आहे. नगरपरिषद निवडणुकीत आमदार, खासदार तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातेवाईकांना उमेदवारी मिळाल्याचे चित्र होते. आता तेच चित्र महापालिका निवडणुकीतही मतदार आणि कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळेल. राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी आत्तापासूनच लॉबिंग सुरू केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत अनेक प्रमुख नेते आपल्या नातेवाईकांसाठी इच्छुक आहेत. यामध्ये विनायक राऊत (मुलगा/मुलगी, वाकोला), विनोद घोसाळकर (धाकटी सून पूजा घोसाळकर, दहिसर), खासदार संजय दिना पाटील (मुलगी, भांडूप), आमदार सुनील प्रभू (मुलगा, गोरेगाव), आमदार अजय चौधरी (सून, परळ), आमदार सचिन अहिर (मुलगी, वरळी), श्रद्धा जाधव (मुलगा, वडाळा) आणि माजी आमदार दगडू सकपाळ (मुलगी, लालबाग) यांचा समावेश आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही अशीच स्थिती आहे. खासदार धनंजय महाडिक त्यांचे पुत्र कृष्णराज महाडिक (प्रभाग क्रमांक ३), आमदार राजेश क्षीरसागर त्यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर (प्रभाग क्रमांक ७) आणि माजी आमदार जयश्री जाधव त्यांचे पुत्र (प्रभाग क्रमांक १८) यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....

