AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

असे काही साप आहेत, जे मेल्यानंतर देखील माणसाला चावू शकतात. त्यामुळे अशा सापांपासून दूर राहाणं गरजेचं असतं, अशा काही घटना देखील घडल्या आहेत. हे साप अत्यंत विषारी असतात.

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात
SnakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 06, 2026 | 8:44 PM
Share

सापांबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. सापांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे आपण अनेकदा दिसला साप की लगेच त्याला मारतो. पण या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील केवळ काही जातीच या विषारी आहेत. भारतामध्ये जे साप आढळतात त्यांचं वर्गीकरण सामान्यत: विषारी, निमविषारी आणि बिनविषारी प्रजाती असं केलं जातं. यामध्ये बिनविषारी सापांच्या प्रजातीच अधिक आहेत. विषारी सापांच्या प्रजाती या खूप थोड्या आहेत. तीच अवस्था निमविषारी सापांची देखील आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात प्रमुख्यानं चार प्रमुख विषारी सापांच्या जाती आढळून येतात. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, नाग आणि घोणस या सापांचा समावेश होतो. यातील नाग प्रजातीचा साप हा ओळखण्यासाठी खूप सोपा असतो, कारण तो त्याला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा फडी काढतो, त्यामुळे तो सहज ओळखता येतो. मात्र साप कोणताही असो त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, किंवा मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, सर्पमित्र त्या सापाला त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडतील.

मात्र तुम्हाला सापांबद्दल एक गोष्ट माहिती आहे का? की काही सापांच्या प्रजाती अशा आहेत, त्या मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. बीबीसीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार आसाम राज्यात अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये सापाने मृत्यूनंतर देखील माणसाला चावा घेतला आहे, सापाने चावा घेतल्यानंतर सर्पदंश झालेली व्यक्ती तब्बल 6 दिवस रुग्णालयात होती, योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे जीव वाचला. जे साप मेल्यानतंरही माणसाला चावू शकतात, त्यामध्ये नाग, घोणस आणि ब्राऊन स्नेक्स या तीन जातींच्या सापांचा प्रामुख्याने समावेश होतो. यातील दोन जाती नाग आणि घोणस हे भारतात आढळून येतात. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ब्राऊन स्नेक्स ही सापाची प्रजात ऑस्ट्रेलियामध्ये आढळते.

साप मेल्यानंतरही कसा चावतो

तज्ज्ञांच्या मते सापांचं विष हे माणसाच्या लाळे सारखं असतं, जे विषारी साप असतात, त्यांच्या विष ग्रंथिमध्ये ते विष साचलेलं असतं. आणि तुम्ही जेव्हा सापाला मारता तेव्हा काहीही साप हे असे असतात की त्यांची नर्वस सिस्टीम लगेच बंद होत नाही. साप मेल्यानंतर त्याच्या शरीरातील एक एक अवयव हळुहळु निकामी होतो, मात्र त्यादरम्यान तुम्ही त्याला स्पर्श केला तर तो तुम्हाला चावण्याची शक्यता असते, अशी माहिती बिबीसीच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...