AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आग्रा येथून डुप्लिकेट चाव्या आणून दुचाकी लांबवणारा चोरटा गजाआड

चोरट्याने अनेक महागड्या बाईक लिलया चोरल्या होत्या. या चोरट्याकडून चार मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्यांची किंमत १ लाख ९५ हजार रुपये आहे.

आग्रा येथून डुप्लिकेट चाव्या आणून दुचाकी लांबवणारा चोरटा गजाआड
crime news
| Updated on: Mar 05, 2026 | 9:35 PM
Share

मोटर सायकली चोरी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी केला आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश केला आणि एका सराईत आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी आग्रा येथून डुप्लिकेट चावी आणून कल्याण शहरात दुचाकी चोरी करायचा अशी अजब माहिती उघडकीस आली आहे. या चोरट्याकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ९५ हजार रुपये आहे. हा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलिसांना मोटर सायकल चोरी करणारा आरोपी कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी कल्याण पश्चिमेकडील बोंबिल गल्ली परिसरात सापळा रचला. पोलिसांनी यावेळी शाहरूख जाकीर हुसेन (वय २७) याला अटक केली. तो मूळचा  आग्रा येथील असून सध्या कल्याणमध्ये रस्त्यांवर फिरस्ता म्हणून राहत होता.

दिनांक २ मार्च २०२६ रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी चोरीस गेलेली बजाज कंपनीची CT 110 X (MH-05 FC 8920)  मोटारसायकल घेऊन उभा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने गेल्या ५ ते ६ महिन्यांत कल्याण शहरातील विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.सदर गुन्हे महाराष्ट्र पोलीस अंतर्गत बीएनएस कलम ३०३ ( २ ) प्रमाणे नोंदविण्यात आले आहेत. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...