AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारत की न्युझीलंड, T20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ ? फायनलपूर्वी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

India vs New Zealand Final : रविवारी भारत आणि न्युझीलंडदरम्यान टी20 वर्ल्डकपचा फायनल सामना होणार आहे. या सामन्यात विजयी ठरणारा संघ टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे. न्युझीलंड आणि भारतीय संघ टी 20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत किती वेळा सामने आले, त्यांच्यापैकी सर्वात जास्त सामने कोणता संघ जिंकलय, जाणून घेऊया A to Z माहिती

IND vs NZ : भारत की न्युझीलंड, T20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ ? फायनलपूर्वी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
भारत वि. न्युझीलंड अंतिम सामना रविवारी रंगणार आहेImage Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 1:39 PM
Share

India vs New Zealand Head to Head T20I Matches :  T20 वर्ल्ड कप 2026 ( T 20 World Cup Final) ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना उद्या, 8 मार्च रोजी होणार आहे, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड फायनलमध्ये आमनेसामने येतील. हा सामना जिंकून टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी तिसऱ्यांदा उचलण्याचं टीम इंडियाचं ध्येय असेल तर तर भारताला हरवून पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचं न्युझीलंडच्या टीमचं लक्ष्य असेल. पण या दोन्ही संघामध्ये वरचढ कोम आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यासाठी तुम्हाला दोन्ही संघांच्या 30 टी20 सामन्यांचा संपूर्ण हिशोब जाणऊन घ्यावा लागेल.

IND vs NZ फायनलपूर्वी 30 सामन्यांचा हिशोब

आपण ज्या 30 टी-20 सामन्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ते भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत खेळले गेलेले सामने आहेत. यामध्ये टी-20 वर्ल्डकपमधील त्यांच्या सामन्यांचा समावेश आहे. जर आपण दोन्ही संघांमधील 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचे निकाल विचारात घेतले तर एकूण सामन्यांवर भारताचा वरचष्मा दिसून येतो. मात्र आयसीसी सामन्यांचा, टी20 वर्ल्डकपमधील सामन्यांचा विचार केला तर न्यूझीलंडचा विजय 100% निश्चित असल्याचे दिसून येते.

कोणाचं पारडं भारी ?

भारताने एकूण 30 पैकी 16 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने 11 सामने जिंकले, तर दोन्ही संघांमध्ये 3 सामने बरोबरीत सुटलेत. टी-20 वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 3 वेळा एकमेकांसमोर आले आहेत आणि तिन्ही वेळा न्यूझीलंडने भारताला नमवून विजय मिळवलाय. 2007, 2016 आणि 2021 टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. न्यूझीलंडने 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये 10 धावांनी, 2016 साली 47 धावांनी आणि 2021 च्या वर्ल्डकपमध्ये 8 गडी राखून भारताचा पराभव केला.

भारतीय भूमीवर IND vs NZ रेकॉर्ड

T20 वर्ल्ड कप 2026 चा उद्याचा IND vs NZ हा अंतिम सामना हा भारतीय भूमीवर होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा घरच्या मैदानावरचा रेकॉर्ड जाणून घेऊया. दोन्ही संघ भारतीय भूमीवर 16 टी-20 मॅचेसमध्ये आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारत न्युझीलंडवर 11-5 अशा संख्येने वरचढ ठरला आहे.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?