AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी परीक्षेबद्दल बोर्डाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट दहावीची परीक्षा आता वर्षातून…

राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून यादरम्यान अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. सीबीएसईकडून याबाबत खुलासा करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे.

दहावी परीक्षेबद्दल बोर्डाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट दहावीची परीक्षा आता वर्षातून...
10th exam
| Updated on: Feb 20, 2026 | 1:21 PM
Share

राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रशासनाकडून मार्गदर्शन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10 वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत परीक्षा सुरू असेल. आज विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे. राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली. अनेक भरारी पथके तयार करण्यात आली असून कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाचा भर आहे. काही केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. अगोदरच शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले की, कॉपी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आता दहावीच्या परीक्षेबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे.

Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक अत्यंत मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. दहावीची पहिली परीक्षा सक्तीची न दिल्यास दुसरी संधी मिळणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही.

किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल. नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच थोडक्यात काय तर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पळ वाट शोधता येणार नाही.

सीबीएसईकडून वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाणार ही वस्तूस्थिती असली तरीही पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. हा मोठा निर्णय बोर्डाने घेतला आहे. एसेंशियल रिपीट श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. बोर्डाने यावर आता भूमिका स्पष्ट केली आहे. वर्षातून दोनदा दहावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने नक्कीच घेतला आहे. मात्र, नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल हे स्पष्ट केले.

Follow Us
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी