AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान

ते भेटले असतील तर त्यात… पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Jul 09, 2026 | 1:37 PM
Share

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक पार पडल्याने चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली. “मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. राज्यात जे काही असेल त्यासाठी आम्ही उपलब्ध असलेले सर्व पर्याय वापरतो. आम्ही सर्वजण एकत्र बसून चर्चा करतो,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, “ते भेटले असतील तर त्यात काही चुकीचे नाही. भेटणे हा त्यांचा विषय आहे. राज्यात सर्वांनी मिळून काम करण्याची परंपरा आणि पद्धत आहे,” असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

Published on: Jul 09, 2026 01:37 PM

Follow Us