तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले; मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं
मनसे रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील दादर येथील सावरकर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मिमिक्री करत विविध मुद्द्यांवर निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी रेल्वे भरती, रेल्वे स्थानकांवरील स्टॉल वाटप आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले. “रेल्वे भरती, स्टेशनवरील स्टॉल आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवा. बेसावध राहू नका, अन्यथा पायाखालची जमीन सरकेल,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरील दुर्घटनेचाही उल्लेख केला. या घटनेवर प्रश्न उपस्थित केल्यास त्याला राजकारणाचे स्वरूप दिले जाते, असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. “विरोधक सत्तेत असताना आंदोलने केली जात होती, तेव्हा ते राजकारण नव्हते का? आता प्रश्न विचारले की महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगितले जाते,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी पुढे राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली. “राम मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत प्रश्न विचारला तर तो धर्माचा अपमान कसा होतो? मंदिराबद्दल आमचीही तेवढीच आस्था आहे. चोरी झाली असेल तर त्याबाबत प्रश्न विचारणे चुकीचे नाही,” असे ते म्हणाले. तसेच राम मंदिर ट्रस्टमधील विश्वस्तांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी भाष्य करत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.
Published on: Jul 09, 2026 01:30 PM
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले...
जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरेंनी सांगितलं 2008
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा..
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड