AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss ने रुचिताला दाखवला बाहेरचा रस्ता…! ओक्साबोक्शी रडली… व्हिडीओ पाहून म्हणाल…

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातून रुचिता हिचा गेम झाला ओव्हर... सर्वांना मिठी मारत रडली ओक्साबोक्शी... व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रुचिता हिची चर्चा...

Bigg Boss ने रुचिताला दाखवला बाहेरचा रस्ता...! ओक्साबोक्शी रडली... व्हिडीओ पाहून म्हणाल...
Bigg Boss Marathi 6
| Updated on: Mar 07, 2026 | 1:52 PM
Share

Bigg Boss Marathi 6: Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ शोमधील खेळ आता रंगात आला आहे. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत घेत आहे. पॉवर कीमुळे तर अनेकांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं देखील दिसलं… सांगायचं झालं तर, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात तीन वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली. त्यामुळे खेळात एक नवीन ट्विस्ट आला… आता या आठवड्यात घरातून बाहेर कोण जाणार, याच प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. यामध्ये रुचिता जामदार हिचं नाव चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रुचिता ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तब्बल आठ आठवड्यांनी रुचिता बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आली आहे… असं सांगण्यात येत आहे…

नुकताच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये अभिनेता रितेश देशमुख अचानक एलिमिनेशनचा धक्का देतो. रितेश म्हणतो, ‘जेव्हा जेव्हा घरात गेमला हलकं घेतलं जातं, तेव्हा मी आणि बिग बॉस अ‍ॅक्शन घेतो… त्यामुळे यावेळी होणार आहे, घरातील एलिमिनेशन… घरच्यांची भेट घ्या… स्वतःच्या नावाची पाटी काढा आणि बाहेर या… मी येथे तुमची वाट पाहत आहे…’, रितेश असं म्हणाल्यानंतर रुचिता रडू लागते… सोशल मीडियावर प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणला, ‘रुचिता सिक्रेट रुममध्ये आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रुचिता नाही सागर घराबाहेर गेला आहे…’, ‘रुचिता आणि विशाल यांच्यामुळे पूर्ण बिग बॉसचं घर आहे…’ असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसच्या घरातील कोणाचा प्रवास संपला याची चर्चा रंगली आहे.

प्रोमोमध्ये घरातील वातावरण खूपच भावूक झाल्याचं चित्र दिसत आहे… विशाल आणि रुचिता दोघेही रडताना दिसत आहेत… पण नक्की कोण घराबाहेर आलं याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आणि रुचिता घराबाहेर पडली आहे की, सागर? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार