AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ जेतेपदासाठी लढत देणार आहे. असं असताना या सामन्याबाबत बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागताच पाच गैरसमज दूर होतील.

IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्या
IND vs NZ Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात एका झटक्यात 5 गैरसमज दूर होतील, कसं ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 07, 2026 | 3:28 PM
Share

India vs New Zealand, Final: आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा संघ कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आता आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लढत होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण न्यूझीलंड संघाने कायम टीम इंडियाचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे धाकधूक असणं सहाजिकच आहे. गेल्या काही वर्षांपासून या सामन्याबाबत गैरसमज प्रचलित झाले आहेत. आता टीम इंडियाकडे एक चांगली संधी चालून आली आहे. भारतीय संघ एका विजयासह पाच गैरसमज दूर करू शकतो. पण आता प्रश्न असा आहे की हे पाच गैरसमज आहेत तरी काय? टी20 वर्ल्डकप आणि न्यूझीलंडच्या सामन्याच्या आकडेवारीशी संबंध काय? भारतीय संघाची सध्याची ताकद पाहता न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढू शकते. चला जाणून घेऊयात एक एक करून..

पहिला गैरसमज: गतविजेत्या संघाने जेतेपद मिळवलं नाही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं हे दहावं पर्व आहे. आतापर्यंत नऊ पर्व झाली असून कोणत्याही गतविजेत्या संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे दहाव्या पर्वात इतिहास बदलण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. भारताने 2024 टी20 वर्ल्डकपचं जेतेपद मिळवलं होतं. आता 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं तर हा गैरसमज दूर होईल.

दुसरा गैरसमज: यजमान संघ जेतेपद जिंकलेला नाही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आणखी एक गैरसमज प्रचलित आहे. यजमानपद असलेला संघ कधीही जेतेपदाची चव चाखू शकलेला नाही. 2026 स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे आणि अंतिम फेरीही गाठली आहे. आता न्यूझीलंडला पराभूत करताच हा गैरसमज दूर होईल.

तिसरा गैरसमज : अहमदाबादमध्ये आयसीसी जेतेपद मिळवलेलं नाही

तिसरा सर्वात मोठा गैरसमज असा आहे की, अहमदाबादमध्ये भारताने आयसीसी चषक जिंकलेला नाही. या मैदानात एकमेव आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. आता टीम इंडियाने हा सामना जिंकला तर हा गैरसमज दूर होईल

चौथा गैरसमज : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ भारी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड हे संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. तिन्ही वेळेस न्यूझीलंडने भारताला धोबीपछाड दिलेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात हा गैरसमज दूर करण्याची संधी आहे. यासाठी भारताने न्यूझीलंडला धोबीपछाड देणं आवश्यक आहे.

पाचवा गैरसमज: भारत समोर असेल तर न्यूझीलंड चॅम्पियन

आता पाचवा गैरसमज हा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीशी निगडीत आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आयसीसी स्पर्धेतील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत आमनेसामने आले आहे. दोन्ही स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ वरचढ ठरला आहे. 2000 साली न्यूझीलंडने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. तर 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत असं घडलं.

Follow Us
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात