AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहिद आफ्रिदीने भारताचं उदाहरण देत जावयाला फटकारलं, पण शेवटी गरळ ओकलीच

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आणि मध्यान्हात पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बऱ्याच वल्गना करत होते. भारत अंतिम फेरी गाठणार नाही वगैरे... पण भारताने नाकावर टीच्चून अंतिम फेरी गाठली आहे. त्यानंतर आफ्रिदीने भारतीय गोलंदाजाचं उदाहरण देत जावई शाहिन शाह आफ्रिदीला फटकारलं आहे.

शाहिद आफ्रिदीने भारताचं उदाहरण देत जावयाला फटकारलं, पण शेवटी गरळ ओकलीच
शाहिद आफ्रिदीने भारतीय गोलंदाजाचं उदाहरण देत जावयाला फटकारलं, शाहिनबाबत म्हणाला की...Image Credit source: BCCI Twitter/Tv9 Network
| Updated on: Mar 06, 2026 | 9:05 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोणीही विसरू शकणार नाही. कारण मोठी धावसंख्या असूनही इंग्लंडने झुंजार खेळी केली. 253 धावांचा पाठलाग करताना फक्त 7 धावा कमी पडल्या. इंग्लंडच्या पराभव करण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचा हातभार होता. त्याच्या भेदक गोलंदाजीशिवाय हा विजय शक्यच नव्हता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेलच्या 105 धावांच्या खेळीनंतरही टीम इंडियाने विजय मिळवला. सामन्याच्या शेवटी जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटूंची तोंड गप्प झाली आहेत. कारण या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रशीद लतीफ, मोहम्मद अमीर आणि शाहिद आफ्रिदी यांनी भाकीत केले होते की, टीम इंडिया जिंकणार नाही. पण टीम इंडियाने विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.

टीम इंडियाने उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर शाहिद आफ्रीदीने पाकिस्तानी गोलंदाजांचे कान टोचले. त्याने जावई शाहिन शाह आफ्रिदीलाही खडे बोल सुनावले. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, इतर संघांनी दबावाखाली कसे कामगिरी करावी याबद्दल टीम इंडियाकडून शिकले पाहिजे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जर चांगली गोलंदाजी केली असती तर उपांत्य फेरी गाठली असती, असं अफ्रिदीने सांगितलं. शाहिद आफ्रिदीने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. आफ्रिदीने बुमराहाच्या गोलंदाजीचं उदाहरण देत सांगितलं की, जर त्यांचा जावई शाहीन आफ्रिदीने असाच स्पेल टाकला असता तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध उच्च नेट रन रेटसह उपांत्य फेरीत प्रवेश केला असता.

शाहिद आफ्रिदीने कौतुक केलं पण शेवटी पाकिस्तानी रंगही दाखवला. टीम इंडिया अंतिम फेरीत हरेल अशी आणखी एक भविष्यवाणी केली. न्यूझीलंडचा संघ टीम इंडियापेक्षा खूपच मजबूत आहे, असंही त्याने सांगितलं. तसं पाहिलं तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ही म्हण आहे. ती शाहिद आफ्रिदीला लागू पडते. कारण आतापर्यंत त्याने भारताविरुद्ध जितकी गरळ ओकली त्याला भारतीय संघाने खेळातून प्रत्युत्तर दिलं आहे.

Follow Us
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात