AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?

जंतर मंतरवर अजूनही तरूण आंदोलन करतच आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दुसरीकडे सरकार मात्र आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे सातत्याने सांगत आहे. असे असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीची भूमिका समोर आली आहे.

CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त...CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
abhijeet dipke and cockroach janta partyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 3:34 PM
Share

CJP Delhi Protest : कॉकरोच जनता पार्टीने उभे केलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशात चांगला प्रतिसाद मिळतोय. दिल्लीत 20 जुलै रोजी पोलिसांनी तरुणांवर केलेल्या लाठीचार्जनंतर देशात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही मुंबईत तरुणांनी गर्दी करत आंदोलन केले. दुसरीकडे जंतर मंतरवर अजूनही तरूण आंदोलन करतच आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दुसरीकडे सरकार मात्र आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे सातत्याने सांगत आहे. असे असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीची भूमिका समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीची भूमिका काय?

कॉकोच जनता पार्टीसोबत आम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असे सरकारने सांगितले आहे. दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या आणि सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सोनम वांगचूक यांच्याशीही सरकारचे बोलणे सुरू आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी वांगचूक यांची भेट घेतली होती. कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनीही आमच्यासोबत चर्चा करावी, आवाहन मोदी सरकारने केले आहे. कॉकरोच जनता पार्टीने चर्चेचे ठिकाण निवडावे, वेळ निवडावी तिथे आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असेही सरकारने म्हटलेले आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार कॉकरोच जनता पार्टीने मात्र जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला आहे.

तरुणांच्या भावनांवर स्वार होऊन…

सरकारला या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढायचा आहे. परंतु सीजेपीला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केलाय. तरुणांच्या भावनांवर स्वार होऊन काही लोक आपला राजकीय फायदा करून घेत आहेत. आंदोलन भडकवण्याचे काम केले जातेय, असे ते म्हणाले. तसेच सरकार चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चावलणार

दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी घोषणा केली आहे. नीट पेपर लीकमधील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सरकार हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चावलणार आहे, असे मोदी यांनी सांगितले आहे. त्यावरही आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाय, सा पुनरोच्चार सीजेपीने केला आहे. त्यामुळे आता काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच