AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता… वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत सर्वात जास्त लक्ष असणार आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर. आता कर्णधार श्रेयस अय्यरनेच वैभवच्या फॉर्मावर भाष्य केले आहे.

IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता... वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?
| Updated on: Jul 23, 2026 | 3:21 PM
Share

भारतीय टी-20 संघ सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. या स्थित्यंतराच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीसाठी मागील दोन्ही दौरे खराब गेलेले दिसले. अपेक्षेएवढी कामगिरी वैभवने केली नाही. यानंतर वैभवची सर्वत्र टीका झाली. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभव पुन्हा एकदा तगडा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.  आता या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिलीत. आता कर्णधाराला वैभवच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने जे उत्तर दिले त्याची आता जोरदार चर्चा होत आहे.

पत्रकारांशी बोलताना, श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशी आणि इतर तरुण खेळाडूंचा बचाव करत म्हटले की, “त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव आहे आणि त्यांनी त्यावर काम केले आहे. इंग्लंड मालिकेनंतर एक चांगला आराम मिळाला होता. मला खात्री आहे की वैभवने त्याच्या चुका कुठे झाल्या याचे विश्लेषण केले असेल आणि त्या सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले असतील. त्यामुळे, वैयक्तिकरित्या, मला त्याला जास्त सल्ला देण्याची गरज नाही.” श्रेयसच्या या वक्तव्यावरून असे दिसून येते की, संघ व्यवस्थापन वैभवच्या सुरुवातीच्या कामगिरीबद्दल चिंतित होण्याऐवजी, याकडे एक शिकण्याची प्रक्रिया म्हणून पाहत आहे. वैभवच्या प्रतिभेबद्दल कोणतीही शंका नाही आणि असा विश्वास आहे की ही विश्रांती त्याला आपला खेळ अधिक मजबूत करण्यासाठी मदत करेल.

आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना आज 4:30 वाजता सुरु होईल. तर नाणेफेक हे 4.00 वाजता होणार आहे. आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतून भारतीय संघाकडे कमबॅक करण्याची संधी असणार आहे. श्रेयस अय्यरसमोर प्रथम टी-20 मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. या मालिकेत तीन सामने असणार आहेत. भारतीय संघासमोर सध्या टी-20 मध्ये सामना जिंकणे आता अवघड झाल्याचे चित्र पाहायला मिळते. आधी भारतीय संघाचा टी-20 मध्ये दबदबा पाहायला मिळायचा पण आता मागील दोन मालिकांपासून तो दरारा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप