AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपतींनी भर कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या नोटीशीचा उल्लेख करताच शाहरुख, अजयचे मोठे पाऊल! थेट..

Tukaram Munde FDA Notice: कथित पान मसाला, गुटखा जाहिरात प्रकरणात अभिनेता शाहरूख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना अन्न आणि औषधी विभागाने (FDA) नोटीस बजावली होती. त्याला या स्टार्सने उत्तर दिले आहे. आता पुढे काय कारवाई होणार?

राष्ट्रपतींनी भर कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या नोटीशीचा उल्लेख करताच शाहरुख, अजयचे मोठे पाऊल! थेट..
राष्ट्रपती, शाहरूख खान, तुकाराम मुंढे
| Updated on: Sep 30, 2026 | 7:34 AM
Share

Shah Rukh- Tiger Shroff and Ajay Devgan : महाराष्ट्र अन्न आणि औषधी प्रशासनाने (FDA) कथित पान मसाला, गुटखा जाहिरात प्रकरणात शाहरूख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अप्रत्यक्षरित्या तंबाखूयुक्त उत्पादनांच्या जाहिरातीचा ठपका त्यात ठेवण्यात आला होता. त्याला या स्टार्सने उत्तर दिले आहे. आता याप्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

बॉलिवूड दिग्गजांवरील सुनावणी पूर्ण

तुकाराम मुंढे यांच्या मते, तीन अभिनेत्यांपैकी दोनच्या प्रकरणात सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. यातील दोन प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीनपैकी कोणत्या दोन अभिनेत्यांच्या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली हे स्पष्ट केलेले नाही. सध्या FDA कडून याप्रकरणी पुढील प्रक्रिया सुरू आहे. अंतिम कार्यवाहीनंतर चित्र स्पष्ट होईल.

प्रकरण तरी काय?

अन्न आणि औषध प्रशासनाने अशा जाहिरातींविषयी नोटीस दिली होती. यामध्ये कथितरित्या तंबाखू आणि निकोटीनशी संबंधित उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींवर सवाल उपस्थित करण्यात आला होता. अप्रत्यक्ष जाहिरातीत एखाद्या ब्रँड अथवा उत्पादनाचा प्रचार, प्रसार हा एखाद्या वेगळ्या उत्पादनाच्या नावाने केल्या जातो. तंबाखू, निकोटीन संबंधी जाहिरातींशी संबंधित उत्पादनाची जाहिरात आणि प्रचारावर कायदेशीररित्या अनेक बंधनं आहेत. जर अशा खेळी केली तर अशा जाहिरातींवर थेट बंदी घातली जाऊ शकते. कथित जाहिरातीत कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करण्यात आले की नाही, हे तपासण्याचे काम सदर प्रकरणात करण्यात येत आहे.

अद्याप अंतिम फैसला नाही

सध्या शाहरूख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांनी FDA नोटीसला उत्तर दिले आहे. तर दोन अभिनेत्यांच्या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. आता कायदेशीर आणि विभागीय कारवाईनंतर याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काय निर्णय दिला हे समोर येईल. लोकांच्या नजरेत हे तीनही स्टार अभिनेते असतील. पण FDA च्या दृष्टीने ते या प्रकरणात केवळ जाहिरात करणारे असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप