AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: चेहऱ्यावर स्मितहास्य, डोळ्यात तेज अन् अजितदादांची खास छबी; पुणे जिल्हा परिषदेत अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण

पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला अजित पवार यांचं नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेला हा पुतळा आणि छायाचित्र दालन अजितदादांच्या कार्याचा वारसा जपणारे स्मारक ठरणार आहे.

| Updated on: Nov 16, 2026 | 3:07 PM
Share
Ajit Pawar Statue: महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना पुण्यात उजाळा देण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला.

1 / 6
या पुतळ्यात अजितदादांचा हसरा चेहरा, देखणे डोळे आणि त्यांची खास देहबोली पाहायला मिळत आहे. याचे फोटो सध्या चर्चेत आहेत. पुणे जिल्ह्याच्या विकासात अजित पवार यांचं मोठं योगदान राहिलं आहे. विशेषतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागातील विकासकामांवर विशेष लक्ष दिलं होतं. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि पुढील पिढीला त्यांच्या लोकसेवेच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

2 / 6
16 नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

3 / 6
अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुतळ्यामध्ये अजितदादांचा हसरा चेहरा आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यांमधील आत्मविश्वास यामुळे पुतळ्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे.

4 / 6
या पुतळ्याच्या अनावरणावेळी उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांना अभिवादन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थितीही होती. पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ पुतळा उभारण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही. अजित पवार यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण, त्यांची राजकीय कारकीर्द आणि विकासकामांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष छायाचित्र दालनही तयार करण्यात आलं आहे.

5 / 6
याशिवाय त्यांच्या जीवनकार्यावर आधारित कॉफी टेबल बुक आणि लघुपटही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर करण्यात आला. त्यांच्या प्रशासकीय शिस्तीची, निर्णयक्षमतेची आणि लोकाभिमुख कामकाजाची आठवण या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

6 / 6
Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर