AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंचा संपर्क व्हायचा नाही, दादा मात्र पहाटेच सचिवालयात, अमित शाहांची नाव न घेता टीका

दादांचं अचानक जाणं एक प्रकारची महाराष्ट्र आणि पुणे, बारामती, पिंपरी चिंचवडसाठी मोठी हानी आहे. दादा गेल्यावर जी रिक्तता निर्माण झाली आहे, जी पोकळी निर्माण झाली आहे. ती सामूहिक प्रयत्नानंतरही भरली जाणार नाही. या संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. नुकसान आहे. ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. माझ्यासाठीही ही व्यक्तिगत मोठी हानी आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

ठाकरेंचा संपर्क व्हायचा नाही, दादा मात्र पहाटेच सचिवालयात, अमित शाहांची नाव न घेता टीका
amit shahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 3:02 PM
Share

कोव्हिडचा काळ हा फार संकटाचा काळ होता. देशभर हाहा:कार उडाला होता. त्यावेळी घराबाहेर पडेल त्याला कोव्हिड होण्याची भीती होती. अशा संकटाच्या काळातही अजित पवार पहाटेच सचिवालयात असायचे. त्यांचा लँडलाइनवरून फोन यायचा त्यावरून समजायचे. पण त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संपर्क व्हायचा नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अजितदादा आज आपल्यात नाहीत. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. कोव्हिड आला तेव्हा दादा सरकारमध्ये होते. तो संकटाचा काळ होता. देशभरात हाहा:कार उडाला होता. ऑक्सिजनची कमी होती. औषधे नव्हते. गृह मंत्रालयाकडे आपत्तीचं काम असतं. मला सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी संपर्क करावा लागायचा. पण त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्र्यांचा संपर्क व्हायचा नाही. पण दादा सकाळी 7 वाजता सचिवालयात असायचे. तिथून फोनफोनी करायचे. सकाळीच हा माणूस उपलब्ध असायचा. सेक्रेटरीएटमध्ये हा माणूस सकाळी 7वाजता हजर असायचा. जेव्हा कोणी ऑफिसात नसायचे तेव्हा अजितदादा ऑफिसात असायचे. लँडलाइनवरून फोन आल्यावर समजायचं. त्यानंतर 12 वाजेपर्यंत मेल यायचा आणि काम झालं म्हणून सांगायचे. ऑक्सिजनच्या व्यवस्थेबाबत बोलायचे. कामाबाबतची ही तळमळ फार कमी लोकांमध्ये होती. जे लोक बाहेर यायचे त्यांना कोव्हिड व्हायचा. अशा काळात हा माणूस ऑफिसमध्ये येऊन सरकारचं संपूर्ण काम सांभाळायचा, अशी आठवण अमित शाह यांनी सांगितली.

हो तर हो, नाही तर नाही…

दादांना मोठा अनुभव होता. विकासाचा दृष्टीकोण होता. पंचायत राज, सहकार क्षेत्र, कृषी आणि आधुनिक नगरविकासाची दृष्टी त्यांच्याकडे होती. असा लोक नेता आपण गमावला आहे. दादा आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. दादा म्हणजे सकारात्मक व्यक्ती होते. आजही डोळे बंद केल्यावर दादा आपल्यासमोरच आहेत असं वाटतं. मी जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा दादा स्मित हास्य करायचे. हसतमुख नेते होते. स्पष्टवक्ते होते. नाही तर नाही, हो तर हो म्हणायचे. राजकारणात संदिग्ध भाषा वापरली जाते. ते स्वाभाविक असतं. त्यात गैर नसतं. पण कोणतीही मोठी अडचण असली तरी मी दादांचा रोखठोक बाणाच पाहिला आहे. ते हो किंवा नाही हे स्पष्टपणे सांगायचे. संदिग्ध भाषा कधीच वापरायचे नाही. असं रोखठोक बोलणारे फार कमी लोकं असे असतात, असं असं शाह म्हणाले.

तेव्हाही फोन यायचे…

बारामतीतून त्यांनी आपलं करिअर सुरू केलं. आणि आपलं नेतृत्त्व देशपातळीवर नेलं. अनेक लोक संघर्षातून पुढे जातात. पण काही लोकांचं सर्वोच्च स्थानावर गेल्यावरही जमिनीवर त्यांचं लक्ष असतं. असे लोक कमी आहेत. दादा आमच्यासोबत नव्हते तेव्हाही त्यांचे फोन यायचे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबत हे फोन असायचे. मी तुमच्यासोबत नाही, पण पुणे आणि पिंपरीवर अन्याय होऊ नये असं ते म्हणायचे, असं त्यांनी सांगितलं.

पावणे सात वाजता फोन आला

यावेळी त्यांनी दादांचा एक किस्सा सांगितला. दादांनी सहकार क्षेत्रात मोठं काम केलं. मला एक प्रसंग आठवतो. अजितदादा एकदा मला म्हणाले, साखर कारखान्यांना दोनदा आयकर लागतो. सध्या कोणी भरत नाही, पण नोटिसा पेंडिग आहेत. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असल्यापासून आम्ही या प्रश्नाच्या मागे आहोत, पण मार्ग निघाला नाही. मी प्रश्न समजून घेतला. त्यानंतर मी सांगितलं हे काम होऊन जाईल. त्यांनी थोडा वेळ माझ्याकडे पाहिलं. म्हणाले, अमित भाई पाच सहा अर्थमंत्र्यांनी हे काम केलं नाही. मी म्हटलं, हे काम होईल. हे अर्थमंत्र्यांचं काम नाही. सहकार विभागाचं आहे. त्यानंतर काम झालं. त्यांनी सकाळी पावणे सात वाजता मला फोन केला आणि आभार मानले. कामावर इतकं लक्ष असणारा असा हा वेगळाच नेता होता, असंही ते म्हणाले.

Follow Us
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी - अमित शाह
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली; अमित शाह यांचं भावुक विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...