AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor: नैराश्य आणि पायाला जखम… चर्चेनंतर शरद कपूर आले सर्वांसमोर, पहिला व्हिडीओ समोर

Sharad Kapoor: बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची परिस्थिती बिकट असल्याचे पाहायला मिळाले. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Sharad Kapoor: नैराश्य आणि पायाला जखम... चर्चेनंतर शरद कपूर आले सर्वांसमोर, पहिला व्हिडीओ समोर
Sharad Kapoor VideoImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 2:54 PM
Share

बॉलिवूड अभिनेते शरद कपूर सध्या आपल्या वैयक्तिक जीवनातील अडचणी, खराब आरोग्य आणि कामाची कमतरता यामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते खूप अशक्त आणि भावनिक दिसत होते. त्यानंतर शरद यांनी चित्रपट उद्योगातून काम आणि सहकार्याची अपील केली होती. आता अभिनेत्याच्या मदतीसाठी बॉलिवूडमधून आणखी एक मोठे नाव समोर आले आहे. अभिनेते आणि निर्माते सोनू सूद यांनी शरद कपूर यांना भेट दिली आहे. दोघांच्या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सांगितले जात आहे की सोनू यांनी केवळ शरद यांच्या आरोग्याशी संबंधित गरजांची काळजी घेतली आहे, तर त्यांच्यासोबत संभाव्य प्रकल्पाबाबतही चर्चा केली आहे.

सोनू सूद वांद्रे येथे पोहोचून शरद कपूर यांना भेटले

एका रिपोर्टनुसार शरद कपूर यांचा मदत मागणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनू सूद यांनी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले होते की सोनू शरद यांना भेटून त्यांच्यासोबत संभाव्य प्रकल्पावर चर्चा करतील. आता सोमवारी सोनू सूद मुंबईच्या वांद्रे परिसरात शरद कपूर यांना भेटायला पोहोचला. यावेळी दोघांनी बराच वेळ संवाद साधला. त्यांच्या भेटीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक सोनू सूद यांच्या या पावलाची प्रशंसा करत आहेत. रिपोर्टनुसार सोनू सूद यांनी शरद यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्याचीही व्यवस्था केली आहे. मात्र दोघांमध्ये संभाव्य प्रकल्पाबाबत काय चर्चा झाली आणि शरद यांना कशा प्रकारचे काम मिळू शकते, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या ही भेट शरद यांच्यासाठी एक सकारात्मक सुरुवात म्हणून पाहिली जात आहे.

‘दस्तक’ आणि ‘जोश’सारख्या चित्रपटांतून मिळाली ओळख

शरद कपूर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘मेरा प्यारा भारत’पासून केली होती. मात्र त्यांना खरी ओळख १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि याच चित्रपटातून सुष्मिता सेन यांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर शरद ‘तमन्ना’, ‘जोश’, ‘खौफ’, ‘क्योंकि… मैं झूठ नहीं बोलता’, ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’, ‘एलओसी कारगिल’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या चित्रपटांत दिसले. या चित्रपटांत त्यांनी विविध प्रकारची पात्रे साकारत आपली ओळख निर्माण केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते मोठ्या पडद्यावर सक्रिय नाहीत.

Follow Us
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी - अमित शाह
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली; अमित शाह यांचं भावुक विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...