AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cooking Tips: तुमच्या चपात्या गोल आणि टम्म फुगत नाहीत? फॉलो करा फक्त ‘या’ 5 सोप्या टिप्स!

How To Make Gol Roti: खूप प्रयत्न करूनही तुमच्या चपात्या गोल आणि छान फुगत नाहीत का? मग दरवेळी या 5 सोप्या टिप्स वापरून पहा तुम्ही एकदम चपात्या परफेक्ट बनवा.

Cooking Tips: तुमच्या चपात्या गोल आणि टम्म फुगत नाहीत? फॉलो करा फक्त 'या' 5 सोप्या टिप्स!
How To Make Gol Roti or chapati
| Updated on: Nov 16, 2026 | 2:39 PM
Share

How To Make Gol Roti: चपाती अगदी प्रत्येक घरात रोज बनवतो. कधी चपाती जाड होते तर कधी तिचा शेप बरोबर होत नाही. अनेकांना चपाती बनवता येते पण एकदम परफेक्ट गोल आणि टम्म फुगणारी चपाती नाही बनत. यामागचे अनेक कारणं असतात. पीठ मळण्यापासून, गोळे तयार करण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष लाटण्यापर्यंतच्या प्रक्रियेत होणाऱ्या छोट्या चुका असू शकतात. पण चपाती बनवताना तुम्हाला फक्त आम्ही सांगत असलेल्या ५ सोप्या फॉलो करा ज्याच्या मदतीने तुम्ही घरी अगदी गोल, मऊ आणि छान फुगलेल्या पोळ्या नेहमी सहज बनवू शकाल.

पीठ मळताना ‘या’ चुका टाळा!

चपातीसाठी उत्तम पीठ असणं महत्त्वाचं आहे. पीठ हे कधीच जास्त घट्ट मळायचे नाही किंवा जास्त सॉफ्टही मळायचे नाही. मिडीयम असं पीठ असावं. याशिवाय तुम्ही पीठ मळताना त्यात थोडंसं कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे छान कणिक तयार होते.

लगेचच चपाती बनवू नका

कधीही पीठ मळून कणिक तयार झाल्यावर लगेचच चपाती बनवू नकात. कणिकेला थोडावेळ तेल लावून छान कापड घालून मुरायला ठेवा. साधारण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे कणिक सेट होते आणि चपाती लाटणं सोप्प होतं.

पिठाचा गोळाही महत्त्वाचा!

पिठाच्या गोळ्याचा आकार आणि ठेवण, एक उत्तम गोल पोळी बनवण्यात मोठी भूमिका बजावतात. सर्वप्रथम,कणिकेचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये धरून तो पूर्णपणे गोल होईपर्यंत फिरवा. पिठाच्या गोळ्याच्या पृष्ठभागावर कुठेही भेगा जाणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर, तळव्याने हलकेच दाब देऊन तो थोडा चपटा करा. चपटा केलेला हा गोळा सर्व बाजूंनी सारख्या जाडीचा असावा.

चपाती ‘अशी’ लाटा

सर्वात आधी सुक्के पीठ चपातीच्या गोळ्याला लावा आणि मग चपाती लाटायला सुरुवात करा. लक्षात घ्या एकाच जागी चपाती गोल गोल फिरली पाहिजे. अधून-मधून चपातीला पालटून लाटा.

जास्त पातळ चपाती लाटू नका

चपाती गोल बनवायची म्हणून अनेकदा पातळ चपाती लाटली जाते. पण यामुळे चपाती तव्यावर फुगत नाही आणि कडक होते. याशिवाय जास्त सुक्के पीठसुद्धा वापरू नकात.

‘अशी’ फुगेल चपाती!

चपाती फुगवण्यासाठी चपाती नीट भाजनेही महत्त्वाचे आहे. सर्वात आधी छान तवा तापवून घ्या. आणि चपाती टाकल्यावर एका बाजूने हलकी भाजून घ्या. चपातीवर छोटे-छोटे फुगे आले की उलटून घ्या. सरी बाजू नीट भाजली गेली की, पुन्हा एकदा पोळी उलटून घ्या. आता, पहिली बाजू मोठ्या आचेवर असताना, कापडाच्या साहाय्याने किंवा चिमट्याने हलक्या हाताने दाबा. यामुळे पोळी व्यवस्थित फुगेल. पोळी तव्यावर खूप वेळ ठेवू नका, अन्यथा ती कडक होऊ शकते, याची काळजी घ्या.

Follow Us
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ