AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करणार मराठमोळी अभिनेत्री; लोकप्रिय अभिनेत्याने केलं प्रपोज

गेल्या काही काळापासून हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. चाहत्यांना या दोघांच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. आता लवकरच ही अभिनेत्री लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज असल्याचं कळतंय.

| Updated on: Nov 16, 2026 | 11:36 AM
Share
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या प्रेमकहाणीची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात सुरू झालेलं प्रेम, त्यानंतर अनेक वर्षांचं रिलेशनशिप, लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय आणि आता लग्नाची चर्चा... ही जोडी म्हणजे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा.

1 / 8
तेजस्वी आणि करण यांना चाहत्यांकडून 'तेजरन' या नावाने ओळखलं जातं. आता ही लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा लग्नसोहळा नेटफ्लिक्सच्या रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 / 8
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी 2021 मध्ये 'बिग बॉस 15' या रिअॅलिटी शोमध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. शो संपल्यानंतरही त्यांचं नातं कायम राहिलं. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

3 / 8
नुकतंच नेटफ्लिक्सच्या 'देसी ब्लिंग' या रिअॅलिटी शोमध्ये करणने तेजस्वीला हटके अंदाजात प्रपोज केलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.

4 / 8
आता एका इन्स्टाग्राम पेजने केलेल्या दाव्यानुसार, करण आणि तेजस्वी 'देसी ब्लिंग 2' या शोमध्येच लग्न करू शकतात. सध्या दोघंही या शोच्या चित्रीकरणासाठी दुबईमध्ये असल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यांच्या लग्नाबाबत करण, तेजस्वी किंवा नेटफ्लिक्सकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

5 / 8
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या वयात जवळपास नऊ वर्षांचं अंतर आहे. करणचा जन्म 11 ऑक्टोबर 1984 रोजी झाला, तर तेजस्वीचा जन्म 10 जून 1993 रोजी झाला. वयातील अंतर असूनही दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते.

6 / 8
विशेष म्हणजे, लग्नाआधी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेजस्वीच्या आईनेही लग्नाआधी एकत्र राहण्याचा सल्ला दिल्याचं तिने यापूर्वी सांगितलं होतं.

7 / 8
दरम्यान, करणने तेजस्वीला प्रपोज केल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. आता 'देसी ब्लिंग 2'मध्ये ही जोडी खरोखरच लग्नबंधनात अडकणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

8 / 8
Follow Us
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू

मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...