AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor: iPhone 18 घ्यायला पैसे आहेत पण…शरद कपूरच्या अवस्थेवर प्रसिद्ध अभिनेत्यानं सुनावलं

Sharad Kapoor Video Viral: शरद कपूरचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता शरद कपूर खूप अस्वस्थ अवस्थेत दिसत आहे.

Sharad Kapoor: iPhone 18 घ्यायला पैसे आहेत पण...शरद कपूरच्या अवस्थेवर प्रसिद्ध अभिनेत्यानं सुनावलं
| Updated on: Nov 16, 2026 | 11:10 AM
Share

Sharad Kapoor Video: शरद कपूरचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता शरद कपूर खूप अस्वस्थ अवस्थेत दिसत आहे. त्याने आदल्या दिवशी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि म्हटले होते की त्याला आर्थिक मदत आणि कामाची गरज आहे. त्याला बॉलिवूडमध्ये पुनरागमन करायचे आहे. व्हिडिओमध्ये शरद कपूरची अवस्था पाहून अनेक लोकांनी बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, की ती आपल्या कलाकारांना कठीण काळात साथ देत नाही. आता, अभिनेता आर्यन वैदने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद कपूरबद्दल सहानुभूती व्यक्त करताना, त्याने बॉलिवूडचा बचाव केला आणि म्हटले की “एका कलाकाराच्या कठीण काळासाठी संपूर्ण इंडस्ट्रीला दोष देणे अन्यायकारक आहे. बॉलिवूड इतर कोणत्याही व्यवसायासारखेच आहे आणि एका व्यक्तीमुळे संपूर्ण इंडस्ट्री काम करणे थांबवू शकत नाही.”

आर्यन वैदने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने शरद कपूरसोबतच्या त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले की, “अनेक वर्षांपूर्वी मी शरद कपूरसोबत ‘चाहत एक नशा’ या चित्रपटात काम केले होते. शरदचा व्हिडिओ पाहून त्याला खूप दुःख झाले. शरद कपूर यांच्याशी संबंधित संपूर्ण घटनेबद्दल मला माहिती नव्हती, त्यामुळे  मला त्यावर भाष्य करायचे नव्हते. मात्र, बॉलिवूड कोणालाही काम करण्यासाठी सक्ती करू शकत नाही, असे त्याचे मत आहे.

आर्यन वैद म्हणाले, “कधीकधी, चांगल्या काळात कलाकार आपल्या भविष्याचा आणि आर्थिक सुरक्षेचा विचार करत नाहीत. जेव्हा काम कमी होते, तेव्हा आर्थिक अडचणी वाढू लागतात. ही परिस्थिती हळूहळू निराशेला कारणीभूत ठरू शकते. त्याने असेही म्हटले की, काही कलाकार कठीण परिस्थितीत दारूचा आधार घेतात. पैसे हुशारीने खर्च करा. आजकाल लोक आयफोन १८ सारख्या महागड्या वस्तू ईएमआयवर खरेदी करत आहेत, पण लक्षात ठेवा, नवीन फोनचे आकर्षण काही महिन्यांतच नाहीसे होते, तर खराब सिबिल स्कोअर १०-१२ वर्षे तुमचा पाठलाग करू शकतो. “

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...