AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TATA Group: कुठल्याही भानगडीत न पडणारे रतन टाटांचे छोटे बंधु जिमी यांनी अखेर टाटा ग्रुपमधील वादावर सोडलं मौन, थेट चुलत भावाविरोधात घेतली भूमिका

Tata Sons Dispute: रतन टाटा यांचे धाकटे बंधू, जिमी टाटा यांनी टाटा समूहातील वादावर आपली मौन सोडले आहे. नोएल टाटा यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात भूमिका मंडळी आहे. नेमकं प्रकरण जाणून घ्या

TATA Group: कुठल्याही भानगडीत न पडणारे रतन टाटांचे छोटे बंधु जिमी यांनी अखेर टाटा ग्रुपमधील वादावर सोडलं मौन, थेट चुलत भावाविरोधात घेतली भूमिका
Tata Sons Dispute
| Updated on: Nov 16, 2026 | 11:18 AM
Share

टाटा ग्रुपच्या नियंत्रणावरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवीन वळण आले आहे. दिवंगत रतन टाटा यांचे धाकटे बंधू, जिमी नवल टाटा यांनी अखेर या विषयावर आपली चुप्पी तोडली आहे. पुण्यामध्ये राहणारे ८५ वर्षीय जिमी टाटा शक्यतो प्रसिद्धीझोतात नसतात. ते नेहमीच लांब, शांत जीवन जगतात. मात्र, आता त्यांनी टाटा समूहाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली स्पष्ट मते मांडली आहेत. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, जिमी टाटा यांनी एन. चंद्रशेखरन यांना ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष म्हणून तिसऱ्या कार्यकाळासाठी मुदतवाढ देण्याचे समर्थन केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या त्या नियमाचेही समर्थन केले आहे, ज्यानुसार ‘टाटा सन्स’ला शेअर बाजारात लिस्ट करणे अनिवार्य आहे. जिमी टाटा यांची ही भूमिका त्यांचे सावत्र भाऊ, नोएल टाटा यांच्या भूमिकेच्या अगदी उलट आहे.

जिमी यांचे मत नोएल टाटांच्या मतापेक्षा वेगळे!

अलीकडेच टाटा समूहामध्ये, ‘टाटा सन्स’चे मंडळ आणि नोएल टाटा यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. यातील एक म्हणजे नोएल टाटा यांचा ‘टाटा सन्स’ला शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या प्रस्तावाला विरोध आहे. यासोबतच चंद्रशेखरन यांच्या पुन्हा चेअरमन बनण्याच्या विरोधात आहे. या दरम्यान जिमी टाटा यांनी चंद्रशेखरन आणि शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. जिमी टाटा यांनी एका सह-विश्वस्ताशी झालेल्या संभाषणादरम्यान ही मते व्यक्त केली होती, जी नंतर त्या विश्वस्ताने इतर विश्वस्तांपर्यंत पोहोचवली.

सर रतन टाटा ट्रस्टचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले विश्वस्त

जिमी टाटा हे 1989 पासून सर टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. एवढंच नाही तर ते सर्वात जास्त वेळेसाठी सेवा देणारे ट्रस्टी आहेत. या ट्रस्टमध्ये त्यांच्याशिवाय नोएल टाटा आणि जहांगीर हे सुद्धा कायमस्वरूपीचे ट्रस्टी आहेत. पुण्यात राहणारे जहांगीर हे जिमी टाटा त्यांच्यासारखेच साधं जीवन जगतात. आजवर या दोघांपैकी कोणीही टाटा समूहातील अंतर्गत वादांवर उघडपणे भाष्य केलेले नाही. जिमी टाटा हे ‘बाई हिराबाई जमशेटजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन’ आणि ‘पब्लिक सर्व्हिस ट्रस्ट’चेही विश्वस्त आहेत. हे दोन्ही ट्रस्ट ‘टाटा ट्रस्ट्स’चाच भाग आहेत.

लिस्टिंगचे नियम काय आहेत?

टाटा ट्रस्ट्सची एकत्रितपणे टाटा सन्समध्ये सुमारे ६६% भागेदारी आहे. यापैकी केवळ एसआरटीटीकडे २३.५६% हिस्सा आहे. परिणामी, समूहाच्या भविष्याशी संबंधित निर्णयांमध्ये या ट्रस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. RBI ने टाटा सन्सला अप्पर-लेअर एनबीएफसी श्रेणीत ठेवलं आहे. निमयांनुसार या श्रेणीत येणाऱ्या पुढील ३ वर्षाच्या आत कंपनी शेअर बाजार लिस्टमध्ये यावं लागेल. टाटा सन्सने ‘कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी’ म्हणून आपली नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही विनंती फेटाळून लावली. जिमी टाटा यांचे हे मत सध्या सुरू असलेल्या वादावर काय तात्काळ परिणाम घडवेल, हे पाहणे बाकी आहे. आता जोपर्यंत ते एसआरटीटीच्या बैठकांना उपस्थित राहून आपले मत नोंदवत नाहीत, तोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होणार नाही.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...