Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट उधळला
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाडून दिल्ली आणि मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Amitabh Bachchan
महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट उधळला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाडून दिल्ली आणि मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली आहे. दिपक सिंह उर्फ दीप याला ठाण्यातून तर, तर विकास ठाकूर उर्फ विकी याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जलसाबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी दिपक याच्यावर सोपावण्यात आलेली… असा पोलिसांचा संशल आहे.. तर 1984 मध्ये शिख विरोधी दगंलीतील बिग बींच्या कथित वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
Follow Us
