AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 किमी वेगाने धडकणार चक्रीवादळ, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, अलर्ट जारी, थेट..

बंगालच्या खाडीत मोठा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. लवकरच भयंकर चक्रीवादळ किनारपट्टी भागात धडकणार आहे. अनेक राज्यात अलर्ट जारी करण्यात आला.

150 किमी वेगाने धडकणार चक्रीवादळ, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, अलर्ट जारी, थेट..
cyclone alert
| Updated on: Nov 16, 2026 | 9:05 AM
Share

बंगालच्या खाडीत मोठे चक्रीवादळ धडकले आहे. ज्यानंतर भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. या महिन्यातील हे मोठे तिसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी मुरासु आणि अर्णब चक्रीवादळाने भारतातील अनेक भागात धुमाकूळ घातला. त्यातच आता नवीन चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरीत होईल. 17 नोव्हेंबर रोजी हे तूफान चक्रीवादळ पुढे सरकेल. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात हे वादळ धडकेल. ओडिसा, तामिळनाडूसह अन्य राज्यात या वादळाचा तडाखा बघायला मिळाले. जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस यादरम्यान होण्याची शक्यता आहे. काही राज्यात या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीही सुरू करण्यात आली. ओडिसा सरकारने या चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तयारीही सुरू केली.

मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर आम्ही काही टीम तैनात केल्या आहेत. 24 जिल्ह्यांवर बारीक लक्ष आहे. एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि आपत्कालीन सेवा तयार ठेवल्या आहेत. 18 आणि 19 रोजी दाखल होणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नियोजन केले आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसेल. पुडुचेरी आणि कराईकल जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. पश्चिम बंगालच्या काही भागातही पावसाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, चक्रीवादळामुळे मोठा दिलासा मिळत असून थोड्याफार प्रमाणात पाऊस कोसळताना दिसत आहे.

अर्णब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आता या चक्रीवादळादरम्यानही राज्यातील काही भागात पाऊस होईल. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात 150 प्रती किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात प्रशासनाकडून या वादळाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. यादरम्यान अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी