Adinath Kothare : 4000 कोटींचा ‘फेक’ आकडा उघड! अदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’च्या बजेटची पोलखोल, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा दावा
Adinath Kothare : दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. असं सांगितलं जात आहे की, तगडी स्टार कास्ट असलेला सिनेमा 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलाय. पण प्रसिद्ध दिग्दर्शकाना सिनेमाच्या बजेटची पोलखोल केली आहे, सोशल मीडिावर एक पोस्ट करत त्यांनी मोठा दावा केला आहे.

Ramayana : अभिनेता राणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशातील प्रेक्षकांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे. एवढंच नाही तर, सिनेमाची चर्चा फक्त बॉक्स ऑफिसवर होत असलेल्या कमाईमुळे चर्चेत नाही, बजेटमुळे देखील चर्चेत आला आहे. असं सांगण्यात येत आहे की, तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘रामायण’चं बजेट 4000 कोटी रुपये आहे. सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार असून दोन भागांचं बजेट प्रत्येकी 2000 – 2000 कोटी रुपये आहे. पण यावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी सिनेमासाठी नेमका किती खर्च आला असेल यावर मोठा दावा केला आहे.
राम गोपाळ वर्मा मोठा दावा करत म्हणाले, ‘सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे आणि भारतीय सिनेविश्वातील सर्वात हिट सिनेमाच्या दिशेने प्रवास करत आहे. असं असताना देखील असं वातावरण तयार केलं जात आहे की, सिनेमाचं कलेक्शन फार कमी आहे. कारण सिनेमाच्या दोन्ही भागांचा बजेट प्रत्येकी 2000 – 2000 कोटी रुपये आहे. म्हणजे 4000 कोटी रुपये असं सांगण्यात आहे. पण हा आकडा चुकीचा आहे.’
राम गोपाळ वर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, ”रामायण’ सिनेमाचा पहिला भाग बनवण्यासाठी 800 कोटी रुपयांपेक्षा देखील कमी खर्च आला असेल.’ याचं कारण समजावत वर्मा म्हणाले, ‘जागतिक कर सवलती आणि सरकारी अनुदाने यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक यात भूमिका बजावतात. हे घटक सिनेमाचा प्रत्यक्ष खर्च लक्षणीयरीत्या कमी करतात. वर्मा यांनी ठामपणे सांगितलं की, ज्याला चित्रपटसृष्टीची समज आहे, त्याला हे नक्कीच उमजेल की दोन्ही भागांचं बजेट सारखंच असेल असं मानणं मूर्खपणाचं आहे.’
वर्मा यांनी एक उदाहरण देत सांगितलं की, ‘दोन्हा भागांचं बजेट सारखं आहे, असं माननं देखील चुकीचं आहे. सिनेमात क्लायमॅक्सचा सीन शूट करताना संपूर्ण बजेट पैकी 50 टक्के खर्च होतो. म्हणून असं समजणं चुकीचं आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या भागासाठी सारखाच बजेट असेल. हे समजणं पूर्णपणे चुकीचं आहे.’ असं देखील राम गोपाल वर्मा स्पष्टच म्हणाले.
राम गोपाल वर्मा यांनी ‘रामायण’च्या भव्य विश्वाची निर्मिती करण्यासाठी आलेल्या खर्चाबाबत एक अत्यंत रंजक पैलू अधोरेखित केला. त्यांनी स्पष्ट केलं की, या सिनेमासाठी तयार केलेला भव्य सेट विशिष्ट पात्रे आणि विविध तांत्रिक घटक केवळ पहिल्या सिनेमापुरतंच मर्यादित राहणार नाहीत; वर्मा यांच्या मते, या गोष्टींचा भविष्यात गेमिंग आणि इतर मोठ्या प्रकल्पांसाठीही सहज वापर करता येऊ शकेल. एवढंच नाही तर, पहिल्या सिनेमासाठी तयार करण्यात आलेल्या सेटअपचा फायदा ‘रामायण’च्या दुसऱ्या भागासाठी नक्कीच होईल… ज्यामुळे पुढे होणार खर्च कमी होईल. असं देखील राम गोपाळ वर्मा म्हणाले.
