AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 Asia Cup 2026 Final : दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानने आम्हाला शिव्या दिलेल्या, म्हणून आम्ही पण..यशवीर गौडचा जोश भरलेल्या सेलिब्रेशनवर महत्वाचा खुलासा

U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final : टीम इंडियाच्या युवा मुलांनी अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारली. श्वासरोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या जोरदार सेलिब्रेशनवर बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

U19 Asia Cup 2026 Final : दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानने आम्हाला शिव्या दिलेल्या, म्हणून आम्ही पण..यशवीर गौडचा जोश भरलेल्या सेलिब्रेशनवर महत्वाचा खुलासा
U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final Image Credit source: Sony LIV screengrab/BCCI
| Updated on: Nov 16, 2026 | 8:51 AM
Share

भारत-पाकिस्तान अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये शनिवारी क्रिकेटचा सर्वोच्च थरार पहायला मिळाला. टीम इंडियाने एक विकेटने पाकिस्तानवर मात केली. शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानात अनेकांना हे सेलीब्रेशन खुपलं आहे. ग्रुप स्टेजमधील पराभवाचा वचपा काढण्याचं जे समाधान होतं, ती भावना सुद्धा त्या सेलिब्रेशनमागे होती. पाकिस्तान विरुद्ध फायनलमध्ये मिळवलेला हा विजय इतका खास का होता? त्याचा खुलासा यशवीर गौडने केला आहे.

ग्रुपस्टेजमध्ये भारत-पाकिस्तानच्या अंडर 19 टीममध्ये आमने-सामने आल्या होत्या. दिवाळीमध्ये ही लढत झालेली. त्यावेळी पाकिस्तानने तीन विकेटने भारतावर मात केलेली. भारतीय टीमने अर्जुन राजपूतच्या शानदार शतकाच्या बळावर 208 धावा केल्या. पण हमजा जरुरच्या शतकाच्या बळावर पाकिस्तानने विजय मिळवला. या मॅच दरम्यान दोन्ही टीम्सच्या खेळाडूंमध्ये बरीच तू-तू-मैं-मैं झाली होती. अपशब्दांचा सुद्धा वापर झाला होता. पराभवामुळे भारतीय खेळाडू काही उत्तर देऊ शकले नव्हते.

आम्ही फायनलची वाट पाहत होतो

आता यशस्वी गौडने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना खुलासा केला आहे. “आम्ही दिवाळीच्या दिवशी मॅच हरलेलो. आमच्यात शाब्दीक वादावादी झालेली. त्यात शिवीगाळ सुद्धा होती. मॅच हरल्यानंतर आम्ही काही बोलू शकलो नाही. आम्ही फायनलची वाट पाहत होतो. आम्हाला चांगलं प्रदर्शन करायचं होतं. आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं होतं, भारत काय करु शकतो”

आम्ही तेच केलं, जे त्यांनी केलं

“विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी केलेल्या सेलिब्रेशनचं यशवीरने समर्थन केलं. पाकिस्तानी खेळाडूंनी जशी प्रतिक्रिया दिलेली, तशीच प्रतिक्रिया भारतीय खेळाडूंनी दिली. आम्ही तेच केलं, जे त्यांनी केलं. आम्ही भारतीय जर्सी परिधान केलेली. आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. प्रत्येकजण इमोशनल झालेला” असं यशवीरने सांगितलं.

सलग दुसऱ्यांदा आशिया कप अंडर 19 ची ट्रॉफी जिंकण्यापासून रोखलं

फायनलमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय टीमने 252 रन्सवर आठ विकेट गमावले होते. त्यावेळी मनल चौहान आणि मोहित उल्वाने नवव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करुन मॅचची दिशा बदलली. मनालने 47 धावा केल्या. मोहित 26 चेंडूत 49 रन्सवर नाबाद राहिला. शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाला विजयासाठी तीन धावांची गरज होती. त्यावेळी मोहितने चौकार ठोकून टीमला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा आशिया कप अंडर 19 ची ट्रॉफी जिंकण्यापासून रोखलं.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी