Gold Silver Price: ‘या’ आठवड्यात कसे असतील सोने-चांदीचे दर? गुंतवणूकदारांच्या नजरा एका निर्णयाकडे
Gold Silver Price Outlook: गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींत सुमारे ४-५ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे किमतीबाबत तज्ज्ञांचा पुढील अंदाज काय आहे हे जाणून घ्या.

16 ते 20 नोव्हेंबरच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात उतार चढाव बघायला मिळेल. गुंतवणूकदारांच्या नजरा एका निर्णयाकडे लागल्या आहेत. गुंतवणूकदार हे प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमधील महागाईची आकडेवारी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे संकेत आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतील. तज्ज्ञांच्या मते, या सर्व घटकांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर अर्थात सोन्या-चांदीच्या किमतीवर होऊ शकतो.
महागाई आणि फेडकडून मिळणारे संकेत महत्त्वाचे
पुढल्या आठवड्यात भारत, अमेरिका, ब्रिटेन, यूरोजोन आणि जापानचे महागाईचे आकडे प्रसिद्ध होणार आहेत. याशिवाय अमेरिकी फेडरल रिजर्व ची FOMC बैठकीती चर्चिले जाणारे मुद्दे आणि अधिकाऱ्याचे निवेदनेही महत्त्वपूर्ण ठरतील. गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीवरही असेल. चीनच्या औद्योगिक उत्पादनाविषयक आकडेवारीही जाहीर केली जाईल. याचा परिणाम, विशेषतः चांदीसारख्या औद्योगिक धातूवर होऊ शकतो.
MCX वर सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
पाठच्या आठवड्यात MCX वर, डिसेंबर डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याच्या भावात ₹५,८४७ (म्हणजेच ४.१०%) ची घसरण होऊन ते प्रति १० ग्रॅम ₹१.३६ लाख या किमतीवर बंद झाले. त्याच वेळी, चांदीच्या भावात ₹८,७९१ (सुमारे ५%) ची घट होऊन ती प्रति किलो ₹१.७६ लाख या किमतीवर आली.
आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव दिसून आला. कॉमेक्सवर सोन्याच्या दरात 5% नी घसरण होऊन डॉलर प्रति औस आणि चांदी 5.43% ने खाली येऊन 49.12 डॉलर प्रति औसवर बंद झाली.
सोन्याला आधार कुठून मिळू शकेल?
ब्रिकवर्क रेटिंग्जचे राजीव शरण यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव ३,८५० ते ४,००० डॉलर्स प्रति औंस या श्रेणीत राहू शकतो. भारतातील लग्नसराईमुळे निर्माण होणारी मागणी आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी सोन्याच्या किमतींना आधार देऊ शकते. पण तरीही व्याजदरांबाबतच्या चिंता कायम आहेत. डॉलरचे बळकटीकरण आणि बाँडवरील वाढत्या परताव्याचा सोन्याच्या किमतींवर अलीकडच्या काळात दबाव दिसून आला आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार पुढील आठवड्यात महागाईच्या आकडेवारीवर आणि फेडरल रिझर्व्हकडून मिळणाऱ्या संकेतांवर बारीक लक्ष ठेवून असतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, बाजारातील गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूकदार म्हणून, आपले पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)
