AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: ‘रामायण’च्या भव्यतेमागे सावंतवाडीच्या मराठमोळ्या तरुणाचा हात; आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचा ठसा

Ramayana: मोठ्या संधी मिळवण्यासाठी केवळ मोठ्या शहरात जन्माला येणं किंवा तिथेच शिक्षण घेणं आवश्यक नसतं, तर कौशल्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जगभरात आपली ओळख निर्माण करता येते, हे प्रथमेशने सिद्ध केलं आहे.

Ramayana: 'रामायण'च्या भव्यतेमागे सावंतवाडीच्या मराठमोळ्या तरुणाचा हात; आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचा ठसा
‘रामायण’ सिनेमाच्या भव्यतेमागे मराठमोळ्या तरुणाचा हातImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2026 | 8:32 AM
Share

Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. भव्य सेट्स, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर हा चित्रपट जागतिक स्तरावर प्रेक्षकांसमोर आणण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या भव्य सिनेमाच्या निर्मितीमध्ये एका मराठमोळ्या तरुणाने महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्याचं नाव आहे प्रथमेश पडवळ!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे हे प्रथमेशचं मूळ गाव आहे. सध्या तो डोंबिवली इथं वास्तव्यास आहे. प्रथमेश नम्रता चंद्रकांत पडवळने आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तब्बल 11 हॉलिवूड चित्रपट आणि 4 भारतीय चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शिक्षणानंतर एनिमेशन क्षेत्रात सुरुवात

प्रथमेशने 3D Animation आणि VFX या विषयात विशेष प्रावीण्यासह बी.ए. पदवी मिळवली आहे. 2015 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला 3D Animation क्षेत्रात काम करताना त्याने या क्षेत्रातील तांत्रिक आणि कलात्मक बारकावे शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी Visual Effects म्हणजेच VFX क्षेत्रात प्रवेश केला. सातत्याने नवीन तंत्रज्ञान शिकणं, कामातील अचूकता आणि मेहनत यामुळे त्यांनी प्रगती केली.

काय असतं Layout VFX Supervisor यांचं काम?

चित्रपटाच्या निर्मितीमध्ये Layout Supervisor ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. एखादं दृश्य पडद्यावर कसं दिसणार, कॅमेरा कोणत्या दिशेने फिरणार, कलाकारांची आणि इतर घटकांची दृश्यातील मांडणी कशी असणार, याचं नियोजन लेआऊट विभागात केलं जातं. कॅमेऱ्याचे अँगल, हालचाली, दृश्यांचं अवकाशीय नियोजन आणि व्हिएफएक्स प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर देखरेख करण्याची जबाबदारी या पदावर असते. ‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटात ही जबाबदारी सांभाळणं म्हणजे मोठं आव्हान आहे. भारतीय संस्कृती आणि महाकाव्याशी संबंधित कथा जागतिक स्तरावर सादर करताना प्रत्येक दृश्य प्रभावी आणि विश्वासार्ह दिसणं आवश्यक आहे. अशा प्रकल्पाचा भाग होण्याची संधी प्रथमेशला मिळाली आहे.

मराठमोळ्या तरुणाच्या यशाचं सर्वत्र कौतुक

डेगवे या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रथमेशचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला आहे. त्याच्या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातून त्यांचं कौतुक होत आहे. ‘रामायण’च्या निमित्ताने एका मराठमोळ्या तरुणाचं नाव आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या पडद्यामागे जोडले जाणं ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी