AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटला; भाजपने ठाकरेंची राजकीय कारकीर्द काढली, विरोधकांकडूनही जोरदार पलटवार

ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. भाजपने उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाची राजकीय कारकीर्द काढली. त्यानंतर विरोधकांकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटला; भाजपने ठाकरेंची राजकीय कारकीर्द काढली, विरोधकांकडूनही जोरदार पलटवार
dharashiv Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 8:42 AM
Share

धाराशिवमध्ये ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटला आहे. धाराशिवमध्ये कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेवरून कैलास पाटील विरुद्ध राणा जगजीत सिंह पाटील समर्थक आमनेसामने उभे ठाकले आहेत. सिंचन योजनेच्या पाहणीवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. आमदार कैलास पाटील यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी केल्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कामासाठी किती वेळा आवाज उठवला? असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला. एक टीएमसी पाण्याला मोहोळमधून विरोध झाला, तेव्हा तुमचे नेते कुठे होते?  असाही सवाल उपस्थित करण्यात आला. या योजनेवरून धाराशिवमध्ये राजकारण पेटलं आहे.

पाहणीनंतर कैलास पाटील यांनी संभ्रम पसरवण्याचा स्क्रिप्टेड ड्रामा केल्याचा आरोप भाजपने केला. कृष्णा-मराठवाडा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याचा दाव भाजपने केला. पाहणीच्या निमित्ताने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा  आरोप भाजपने केला. एकीकडे दुष्काळाच्या झळा शेतकरी सहन करत आहे. तर दुसरीकडे पाण्यावरून राजकारण तापल्याचे समोर येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

धाराशिवच्या हक्काच्या पाण्यावरून आता जिल्ह्यात राजकीय संघर्ष पेटलाय. कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेची पाहणी करत रखडलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी करणारे ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. कैलास पाटील यांच्या पाहणीला भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही काय करत होता? असा सवाल उपस्थित केलाय. तर कैलास पाटील यांचा हा संभ्रम पसरवण्याचा स्क्रिप्टेड ड्रामा असल्याचा घणाघाती आरोप भाजप सोशल मीडिया सेलकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपला प्रतिउत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये कृष्णा-मराठवाडा योजनेच्या पाण्यावरून आता ठाकरे सेना विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगताना दिसतोय.

राजू शेट्टींच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा!

धाराशिवमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावरील येडशी टोलनाका येथे आज राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी नोटिशींद्वारे दिला आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी