AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी तुमच्या मुलांना गुटखा द्या, बॉलिवूड कलाकारांना तुकाराम मुंढे यांनी सुनावले, थेट..

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. त्यातच आता बॉलिवूड कलाकारांबद्दल मोठे विधान तुकाराम मुंढे यांनी केले.

आधी तुमच्या मुलांना गुटखा द्या, बॉलिवूड कलाकारांना तुकाराम मुंढे यांनी सुनावले, थेट..
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 30, 2026 | 7:14 AM
Share

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा फक्त राज्यभरातच नाही तर देशभरात होत आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून हॉटेल, रेस्टारंट, धाबे आणि विविध अस्थापनांवर जोरदार कारवाई केली जात आहे. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड कलाकरारांना देखील सोडले नाही. पानमसाल्याची जाहिरात केल्या प्रकरणात तुकाराम मुंढे यांनी थेट शाहरूख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. हेच नाही तर ही जाहिरात हटवण्याची मागणीही त्यांनी केली. एका मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांनी कलाकारांना पाठवलेल्या नोटीसवर जाहीरपणे भाष्य केले. गुटख्याच्या जाहिरातीवर केलेल्या कारवाईवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, मुळात म्हणते विचार अगदी साधा आहे. नापसंत गोष्टींबद्दल लाळघोटेपणा किंवा दुटप्पी भूमिकेवर त्यांनी भाष्य केले.

दुटप्पीपणा आणि दुहेरी अनेक चेहरे मला आवडत नाहीत. मला कोणाचीही चमचेगिरी करायला अजिबात आवडत नाही. त्यांनी असा युक्तीवाद केला की, लोकांचे वैयक्तिक जीवनात एक आणि व्यावसायिक जीवनात दुसरे असे असू शकत नाही. मला एक कळते की, जर कोणी जाहीरपणे सांगत असेल की एखादे उत्पादन चांगले आहे तर तोच नियम हा उत्पादनाला प्रोत्साहन करणाऱ्या व्यक्तींनाला लागू होतो.

जर तुम्ही पान किंवा गुटख्याची जाहिरात करत असाल तर आधी तुम्ही स्वत:त्याचे सेवन करा. ते तुम्ही केले पाहिजे. तुमच्या मुलांना त्याची सवय लावा. त्यांना सेवन करू द्या. मग त्याची सवय इतरांना लावा. कोणतीही जाहिरात करणे म्हणजे त्या उत्पादनाला आपला चेहरा देणे नव्हे

जे कोणी लोक जाहिरात करत आहेत, त्यांची ती जबाबदारी असते की जनतेने काय करावे आणि कशावर त्यांनी विश्वास ठेवावा. तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळखोरांना सळो की पळो करून सोडण्यात आले. काही जणांवर भेसळखोरी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप