AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या दुधाला पर्याय नाही! तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; बेबी फूडच्या पॅकेजिंग-जाहिरातींवर कडक नियम लावले

Tukaram Mundhe PC News: बेबी फूड आईच्या दुधाच्या समकक्ष असल्याची जाहिरात करता येणार नाही; असा तुकाराम मुंढेंनी मोठा आदेश काढला आहे.

आईच्या दुधाला पर्याय नाही! तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; बेबी फूडच्या पॅकेजिंग-जाहिरातींवर कडक नियम लावले
| Updated on: Sep 29, 2026 | 5:23 PM
Share

एफडीएचे तुकाराम मुंढेंनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. माध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, शाळेत बॅलेन्स डाएट संदर्भात आपण ऑर्डर काढली होती. शाळेच्या बाबतीत आपण जी ऑर्डर काढली त्याचा परिणाम दिसत आहे. पनीर संदर्भात ऑर्डर काढली, आपल्याला परिणाम दिसत आहेत. आतापर्यंत आपण ११ ऑर्डर काढल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला चांगलं अन्न मिळालं पाहिजे. हा आपला उद्देश आहे, असं ते म्हणाले आहेत.

तुकाराम मुंढे म्हणाले की, २२ महिन्यांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी तो आदेश लागू आहे. १८ वर्षांपर्यंत लागू आहे. आता प्रश्न असा लागू होतो की, दोन वर्षापर्यंतच्या मुलांचं काय? अंगणवाडीत जाण्याआधीच्या मुलासांठीही काही नियम आहेत. शिशुसाठी विशेष अन्न, फिडींग बॉटल, सात महिन्यापर्यंत ब्रेस्ट मिल्क याशिवाय दुसरं काहीही देणं अपेक्षित नाही. राज्यभरात औषध दुकानं, वितरक माहिती घेतली. सर्वे केला. त्यानुसार आईचं दुध हे सर्वोत्तम दूध असल्याचे निदर्शनात आले आहे.

ते म्हणाले की, बाळाला जे न्युट्रीशन यातून मिळायला पाहिजे ते बाळाला मिळत नाही. ही अनिवार्य सुचना पॅकेटवर लिहिणं बंधनकारक आहे. पण ते पाळलं जात नाही. बाळाचं आणि आईचं चित्र अशा प्रोडक्टवर असता कामा नये. आम्ही एक आणखी निर्णय घेतला आहे. पुरवठादार, ब्रँड मालक, ई कॉमर्स विक्रेते या सगळ्यांना ऑर्डर लागू राहील. सेव्ह फूड, सेव्ह ड्रग म्हणतो तेव्हा अन्न आणि ड्रग सेफ मिळाला पाहिजे. २२ रेग्युलेशन आतापर्यंत आपण दिलेले आहे.

तुकाराम मुंढेंनी सांगितले की, बेसिक तत्व या ऑर्डर मागे आहे. पॅकेजमध्ये शिशुला हे अन्न कधी दिले जावे यांची माहिती देणे गरजेचं आहे. भारतात यामागे दोन कायदे आहेत. फॉम्मयुला मिल्कला बंदी नाही पण नियम पाळणे गरजेचं आहे. हेल्थ वर याचा इम्पॅक्ट कसा होतो याचा डेटा आमच्याकडे आहे. आहार चुकीच्या पद्धतीने जात आहे. ६ महिन्याखालील मुलांचे ६५ टक्क्यांवरून ५८ टक्केपर्यंत आईच्या दुधाचे स्तनपान हे कमी झाला आहे. ६ महिने आईचेच दूध शिशुला द्यावे.

ते म्हणाले की, शहरी भागात ५२ टक्के स्तनपान केलं जात. ग्रामीण भागात ७५ टक्के स्तनपान चे प्रमाण आहे. उलटी परिस्थिती आहे ग्रामीण भागात जास्त प्रमाण आहे. डिलेव्हरी झाल्यानंतर १ तासात स्तनपान झाला पाहिजे. मात्र यांची आकडेवारी कमी होत चालली आहे. ५० टक्के महाराष्ट्रामधील माता मुलं जन्मलेल्या नंतर तासाभरात दूध पाजत नाही, असं सांगत त्यांनी संपूर्ण आकडेवारी मांडली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, या सगळ्याचा परिणाम हेल्थवर होत आहे. वयोगट १० ते १२ वर्ष पाहिला तर ३५ टक्के बीपी उच्च रक्तदाब चा प्रमाण दिसत आहे. १० ते १९ वयोगट पाहिला तर मधुमेहाचं प्रमाण १२ टक्के आहे. ऑल पॅकेजवर आईचे दूध सर्वोत्तम दूध हे लिहावं लागणार आहे. मेडिकल परिस्क्रिप्शनच्या सल्ल्यानुसार वापर करावा. हा एकमेव पर्याय नाही, असं लिहावं. हे सम्पिमेन्ट्री फुल आहे आणि ६ महिन्यानंतर वापर करावा असा लिहावं. पॅकेजवर आई आणि मुलाचा फोटो वापरता येणार नाही. प्रॉडक्टचा प्रचार करता येणार नाही. आईच्या दुधाच्या समकक्ष अशी जाहिरात करता येणार नाही. मोफत नमुने, कुपन हे देता येणार नाही, असं सांगून त्यांनी अटी स्पष्ट केल्या आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय