AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?

र्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं मत तिने व्यक्त केलं. आम्ही आमचा आवाज उठवत राहू. आंदोलन करत राहू. आजपासून मुंबईत आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे. लोक जिथे आंदोलन करत आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा देता येऊ शकतो, असं मत रिया अहिरने व्यक्त केलं.

Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी...पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?
rhiya ahir mumbai protest viral girlImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 5:46 PM
Share

Mumbai Protets Viral Girl Rhiya Ahir : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. देशभरात स्थानिक पातळीवरही आंदोलन केले जात आहे. काहीही झालं तरी आम्हाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही पाठिंबा मिळत आहे. 22 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात एका धाडसी तरुणींना एकटीने पोलिसांची व्हॅन रोखली. तिच्या या हिमतीचे कौतुक केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या याच व्हायरल तरुणीने टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे.

आपल्यासोबत जे चुकीचं घडतंय…

रिया अहिर असे या तरुणीचे नाव आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना आंदोलनादरम्यान काय घडलं? तिने पोलिसांची व्हॅन का अडवली, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. “मी माझ्या मित्रांची वाट पाहात होते. मला यावेळी दुरून आझादीचे नारे ऐकायला येत होते. आपल्याला स्वातंत्र्य तर अगोदरच मिळालेलं आहे. पण आपल्यासोबत जे चुकीचं घडतंय, अत्याचाराविरोधात आवाज उठवणं फार गरजेचं आहे. माझ्या मित्रांना उशीर होत होता. एक तर मुंबईत पार्किंची अडचण आहे. त्यामुळे अर्धे आंदोलन संपलेले होते. त्यामुळे मला वेळ वाया घालवायचा नव्हता,” असं तिनं सांगितलं.

ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते

तसेच, पुढे बोलताना, मी एकटीच होते. माझ्यासोबत माझे मित्र नव्हते. मला इन्स्टाग्रामवरूनच लोक आम्ही पण आंदोलनात यावं का, असं विचारत होते. मी त्या सगळ्यांनाच या म्हणत होते. सरकारकडे सत्ता आहे. ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. मला अगोदर भीती वाटली होती, असंही तिने बोलून दाखवलं.

मला शहीद व्हायला आवडेल

“मी तेव्हा जिथे उभी होते तेव्हा ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस गाडी हळूहळू चालवत होते. मी करेंगे या मरेंगे असं ठरवलं. गाडी माझ्या अंगावरून गेली असती तरीही मला त्याची पर्वा नव्हती. मी शहीद झाले असते. मला पीडित नागरिक म्हणून जगण्यापेक्षा मला शहीद व्हायला नेहमी आवडेल,” असं तिने ठणकावून सांगितलं.

सर्वोच्च न्यायालय, संयुक्त राष्ट्राला मेल केला

तसेच सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं मत तिने व्यक्त केलं. आम्ही आमचा आवाज उठवत राहू. आंदोलन करत राहू. आजपासून मुंबईत आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे. लोक जिथे आंदोलन करत आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा देता येऊ शकतो. या आंदोलनाचे व्हिडीओ शेअर केले पाहिजेत, लाईक केले पाहिजेत. मी सर्वोच्च न्यायालय, संयुक्त राष्ट्र यांना या आंदोलनाबाबत मेल केलेला आहे. कारण काहीतरी चुकीचं होत आहे, हे सांगणं गरचेचं आहे, असं मत तिने व्यक्त केलं.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...