AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले, धक्कादायक घटना, थेट तरुणावर गुन्हा दाखल..

रत्नागिरीतील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओनंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण बघायला मिळत आहेत. या घटनेचे माहिती मिळताच शहर पोलिसांनी याची दखल घेतली. प्राणीप्रेमीही पोलिस ठाण्यात पोहोचले.

कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले, धक्कादायक घटना, थेट तरुणावर गुन्हा दाखल..
Ratnagiri
| Updated on: Sep 11, 2026 | 7:35 AM
Share

रत्नागिरी शहरात धक्कादायक घटना घडली. या घटनेचा आता व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने एकच खळबळ उडाली. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात दोन तरुणांनी कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामरान मुजगावकर राहणार मिरकर वाडा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आता तरुण चांगलेच अडचणीत सापडल्याचे बघायला मिळतंय. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण कुत्र्यांना दुचाकीला बांधून ओढत नेत असल्याचे दिसत आहे.

यावेळी एका महिलेने या तरुणांना जाब विचारत, कुत्र्यांना अशाप्रकारे फरफटत नेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे महिलेने थेट सुनावले. मात्र, संबंधित तरुणांनी महिलेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तिच्याशी हुज्जत घालत आरडाओरड आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली असून संबंधित तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमीही पोलीस ठाण्यात दाखल झाले. मुक्या प्राण्यांवर अशाप्रकारे अमानुष वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, मुक्या जीवांनाही जगण्याचा अधिकार आहे; त्यांच्याशी अमानुष वर्तन करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, त्या तरुणांनाही गाडीला बांधून फरफटत न्या, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. प्राण्यांना अशी वागणूक देण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...