AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचाराला सुरूवात, रात्री उशिरा..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चाैदावा दिवस आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. उद्या महत्वाची बैठक होणार असून त्यात मुंबईला जाण्याचा निर्णय होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचाराला सुरूवात, रात्री उशिरा..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 11, 2026 | 7:10 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना जरांगे पाटील दिसत आहेत. मराठा समाजाचे वाटूळे केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. हेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख करताना जरांगे पाटील दिसले. शिंदेंच्या मंत्र्यांकडून जरांगे यांच्यावर टीका केली जात आहे. ही टीका सहन करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. उदय सामंत आणि भरत गोगावले यांनी जरांगेंना एकेरी भाषा सहन करणार नसल्याचे म्हटले. विखे पाटील यांनीही स्पष्ट केले की, आम्ही जरांगे यांच्या जवळपास मागण्या मान्य केल्या. आता सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या चर्चेला जाणार नाही.

सरकारकडून काही आदेशही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलीत. शिंदेंचे मंत्री आता जाहीरपणे जरांगेंबद्दल बोलताना दिसत आहेत. जरांगेही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळात बोलणी फिस्कटली. जरांगे आणि सरकार एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे करत आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे.

आंतरवाली सराटीतून त्यांनी काल सरकारवर तोफ डागली होती. त्याचवेळी मुंबईत धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईत मराठा आंदोलकांसह जाणार असे त्यांनी सरकारला ठणकावले. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौदावा दिवस असून प्रकृती खालावल्याने उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय. राष्ट्रवादीच्या आमदारांनी परवा रात्री केलेल्या चर्चेनंतर अद्याप कुठलेच उत्तर नाही, गेल्या चार दिवसांपासून शिष्टमंडळाची चर्चा नाही.

उद्या दुपारी 12 वाजता आंतरवालीत निर्णायक बैठक होईल. आंदोलनाबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रकृती खालावल्याने रात्री उशिरापासून पुन्हा उपचार सुरू करण्यात आले असुन वैद्यकीय पथकाकडून 24 तास लक्ष ठेवले जात आहे. उद्या 12 तारखेला महत्वाची बैठक मराठा समाजाची आंतरवालीत होणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. जरांगे पाटील मुंबईला येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...