AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले

Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले

| Updated on: Jul 23, 2026 | 5:37 PM
Share

मुंबईतील चेंबूर येथे CJPच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार घडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना वाहनातून नेत असताना एका तरुणाने पोलिस व्हॅनच्या मागील बाजूचे दार उघडले. त्यानंतर वाहनात असलेल्या काही तरुणांनी बाहेर उतरून तेथून धाव घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. हा संपूर्ण प्रकार काही क्षणांत घडला.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकांनी या प्रसंगाची तुलना चित्रपटातील दृश्यांशी केली आहे. काही नेटकऱ्यांनी याला “फिल्मी स्टाईल सुटका” असे संबोधत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती किंवा सविस्तर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. व्हायरल व्हिडिओनंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, संबंधित घटनेची सत्यता आणि संपूर्ण पार्श्वभूमीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Published on: Jul 23, 2026 05:37 PM

Follow Us