ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणात आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी पडद्यामागून कटकारस्थान सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. राजकीय नेत्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत त्यांनी ही बाब जनतेसमोर आणण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षणाचे प्रमुख कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच समोर आलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला या प्रकरणात खोटं ठरवून मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय पक्षांमधील अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन तिसऱ्याला लाभ मिळवून देण्याचा कट शिजत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, “माझ्या कानावर कुजबुज आली की काहीही करून मला खोटं ठरवावे लागणार आहे.” त्यांच्या मते, पडद्यामागून अशा योजना आखल्या जात आहेत ज्यामुळे मराठा समाज आणि त्यांचे आंदोलन धोक्यात येईल. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, मराठा समाजाच्या मतांवर निवडून आलेले नेते मराठा आंदोलनाला पाठिंबा न देता ते दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना का वाचवत आहेत? शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी क्लिपची तारीख सांगितली असतानाही अन्य नेते गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. हे षडयंत्र जनतेसमोर उघड करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
Published on: Oct 25, 2026 12:20 PM
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,

