AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दुबईकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच अन्नसाठा, सुपरमार्केट आणि दुकाने रिकामी, फळे आणि भाज्या…

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा मोठा फटका खाडी देशांना बसताना दिसत आहे. त्यामध्येच दुबईमध्ये मोठी खळबळ उडाली. दुबईचा अन्नसाठा संपत आलाय. इराणकडून मोठे हल्लेही दुबईवर केली जात आहेत. आता भाज्या, फळे सर्वकाही दुबईतून संपत आहे.

मोठी बातमी! दुबईकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच अन्नसाठा, सुपरमार्केट आणि दुकाने रिकामी, फळे आणि भाज्या...
Dubai
| Updated on: Mar 07, 2026 | 12:07 PM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. मात्र, 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर अमेरिका हल्ला करणार याची कल्पना खाडी देशांनाही नव्हती. या युद्धाचा मोठा परिणाम खाडी देशांना भोगावा लागत आहे. थेट इराण त्यांच्या देशात असलेल्या अमेरिकन तळांवर हल्ला करत आहे. तेल वाहतूक आणि गॅस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.  इराणकडून महत्वाचा सागरी मार्गही बंद करण्यात आला. भारतासह जगातील जवळपास देश संकटात आहेत. गॅसचा पुरवठाही बंद झाला. या युद्धाच्या सर्वाधिक झळा जर कोणत्या देशांना बसल्या असतील तर साैदी अरेबिया, दुबई, कतार आणि कुवेत यांना. अमेरिका आणि इस्त्रायलने जसा ही हल्ला इराणवर केला, तसा हल्ला थेट इराणकडून या देशांमध्ये करण्यात आला आणि थेट अमेरिकेचे लष्कर तळ उद्ववस्थ करण्यात आली. हेच नाही तर दुबईचे विमानतळही इराणच्या निशाण्यावर होते. तिथेही मोठा हल्ला करण्यात आला.

दुबई आणि साैदी अरेबियाला या युद्धाची झळ बसली आहे. अनेक ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आले, अजूनही हल्ले सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर परिस्थिती झपाट्याने खराब झाली. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानताना दिसत नाही. सध्याच्या घडीला अमेरिकाही तणावात आहे.

आता दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम खाडी देशावर बघायला मिळत आहे. दुबईसह खाडी देशातील फळे आणि भाज्या जवळपास संपत आलेले आहेत. हर्मुजची सामुद्रधुनी व्यापारी वाहतुकीसाठी बंद आहे. जेबेल अली बंदरावर झालेल्या हल्ल्यामुळे भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि ताजी फळे यांची आवक थांबली आहे.

फळे आणि भाज्यांची टंचाई सध्याच्या घडीला दुबईमध्ये जाणवत आहे. खाडीतील जवळपास देशांना अन्न पुरवठा हर्मुजच्या मार्गाने होतो तो मार्ग इराणने बंदल केला. दुबईतील अनेक सुपरमार्केट आणि मॉलमध्येही भाज्या आणि दूध, फळे नाहीत. दुबईसह खाडी देशातील परिस्थिती अशी गंभीर होत आहे. दुबईमध्ये फक्त 10 दिवसांचाच अन्न साठा असल्याचेही सांगितले जात आहे.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप