AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Success Story : चार वेळा नापास, पण हार मानली नाही; कोचिंगशिवाय बनली कलेक्टर, वाचा यशोगाथा

Sanjita Mohapatra : देशातील लाखो विद्यार्था युपीएससी परीक्षा पास होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र यात सर्वांना यश मिळत नाही. आज आपण 4 वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या संजिता महापात्रा यांची माहिती जाणून घेऊयात.

UPSC Success Story : चार वेळा नापास, पण हार मानली नाही; कोचिंगशिवाय बनली कलेक्टर, वाचा यशोगाथा
UPSC Success StoryImage Credit source: Google
| Updated on: Mar 06, 2026 | 7:21 PM
Share

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी परीक्षा ही जगातील सर्वात अवघड परीक्षेपैकी एक आहे. देशातील लाखो विद्यार्था ही परीक्षा पास होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र यात फार कमी लोकांना यश मिळते. ही परीक्षा पास होणे म्हणजे प्रचंड अभ्यास, एकाग्रता, हुशारीचा संगम आहे. या परीक्षेत संजिता महापात्रा यांनी 4 वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यश मिळवले होते. त्यांच्या प्रवसाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोण आहेत संजिता महापात्रा ?

संजिता महापात्रा या ओडिशातील राउरकेला येथील रहिवासी आहे. संजिता यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी IIT कानपूरमध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग सुरू असताना त्यांनी युपीएससी परीक्षेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.

कोचिंगशिवाय UPSC ची तयारी सुरू केली

संजिता महापात्रा यांनी पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये त्यांना प्रिलिम्स परीक्षाही पास होता आली नाही. यामुळे त्या नाराज झाल्या आणि काही काळासाठी एका कंपनीत नोकरी केली.

जॉब सोडून अभ्यास

संजिता यांनी जॉब सुरू असताना यूपीएससी परीक्षेचा चौथा अटेम्पट दिला, मात्र या प्रयत्नातही तिला अपयश आले. त्यानंतर त्यांनी केवळ तिच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा जोमाने यूपीएससीची तयारी सुरू केली. कोणत्याही कोचिंगशिवाय ऑनलाइन अभ्यास, एनसीईआरटी पुस्तके आणि वर्तमानपत्रांच्या मदतीने अभ्यास केला.

सासरकडून पूर्ण पाठिंबा

संजिता यांनी यूपीएससीची तयारी करत असताना लग्न केले. लग्नानंतर सासरच्यांनी त्यांना अभ्यासात पाठिंबा दिला. त्यांचे पती बिस्वा रंजन मुंडारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात, त्यांनी शक्त तितकी मदत केली.

पाचव्या प्रयत्नात आयएएस

कठोर परिश्रम आणि सतत प्रयत्नांनंतर, संजिता महापात्रा यांनी पाचव्या प्रयत्नाक 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 10 वा क्रमांक मिळवला. चारवेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता सातत्याने अभ्यास केल्यास यश मिळू शकते हे संजिता यांनी दाखवून दिले आहे.

Follow Us
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.