मोठी बातमी! मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा NCB च्या हाती
मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मोठी कारवाई करत कोकीनचा प्रचंड साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 349 किलोग्रॅम उच्च दर्जाचे कोकीन हस्तगत करण्यात आले. या जप्तीची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत सुमारे 1,745 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. असं ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली आहे.

या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाल्याचा दावा NCB ने केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकीन मुंबईत कसे पोहोचले, त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे आणि हा साठा कुठे पाठवला जाणार होता, याबाबत सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, अमित शाह यांनी या यशस्वी कारवाईबद्दल NCB चं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले की, “मुंबईत NCB ने 349 किलो हायग्रेड कोकीन जप्त केलं आहे. ही कारवाई एजन्सीच्या ‘बॉटम टू टॉप’ दृष्टिकोनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ड्रग्स तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्धार कायम आहे.”
Published on: May 01, 2026 01:18 PM
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता