Petrol – Diesel Price Hike | सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार? राहुल गांधींचं भाकीत काय?
देशभरात इंधन दरवाढीचे संकेत मिळत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही प्रत्येकी सुमारे 50 रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
देशभरात इंधन दरवाढीचे संकेत मिळत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही प्रत्येकी सुमारे 50 रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अलीकडेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. एलपीजी दरवाढीचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी आणि औद्योगिक क्षेत्रांवर आधीच दिसून येत असून, इंधन दरवाढ झाल्यास त्याचा व्यापक परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत इंधन दरवाढीवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “जनतेला निवडणुकांचं बिल भरावं लागणार आहे. गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलमध्येही वाढ होणार,” असे म्हटले आहे.
एकूणच, दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं दिसतंय.
Published on: May 02, 2026 09:50 AM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद

