Sanjay Raut | मराठी मुद्द्यावरून राजकारण तापलं; मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर थेट हल्ला
राज्यात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. मात्र, या निर्णयाला विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत “मराठी बोलणार नाही” असे म्हणणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना मराठी भाषा आणि अस्मिता जपण्याची गरज मान्य केली, मात्र भाषेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा हिंसा मान्य नसल्याचे स्पष्ट केले.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. “मराठीचं नाव घेतल्यावर मुख्यमंत्र्यांना मिर्चा का झोंबतायत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “जे लोक काही दिवसांसाठी राज्यात येतात, त्यांना भाषा शिकण्याचा आग्रह नसतो. मात्र जे येथे कायमस्वरूपी राहून व्यवसाय किंवा नोकरी करतात, त्यांनी मराठी भाषा शिकणे आवश्यक आहे,” असे राऊत यांनी म्हटले. एकूणच, मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले असून, विविध पक्षांच्या भूमिकांमुळे हा वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण