AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board HSC Result 2026 : बारावीचा निकाल झटपट पाहा tv9 मराठी वेबसाईटवर, एका क्लिकवर निकाल तुमच्या हाती..

Maharashtra Board HSC 12th Result 2026 : बारावी परीक्षेचा निकाल अगदी काही वेळात लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये या निकालाबद्दल मोठी उत्सुकता आहे. आपण टीव्ही9 मराठीवर झटपट आपला बारावीचा निकाल पाहू शकता.

Maharashtra Board HSC Result 2026 : बारावीचा निकाल झटपट पाहा tv9 मराठी वेबसाईटवर, एका क्लिकवर निकाल तुमच्या हाती..
Maharashtra Board HSC 12th Result
| Updated on: May 02, 2026 | 10:31 AM
Share

आज 2 मे 2026 रोजी बारावी परीक्षेचा निकाल आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. ज्यामध्ये राज्याचा निकाल, विभागाचा निकाल आणि राज्यातून किती विद्यार्थ्यांना शंभरी गाठता आली, हे जाहीर केले जाईल. HSC च्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. यंदाच्या राज्याच्या निकालाच्या टक्केवारीमध्येही वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. बारावी आणि दहावी परीक्षेत कोकण विभाग कायमच अव्वल ठरतो. यंदा नक्की कोणता विभाग बाजी मारतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. संपूर्ण निकालाची टक्केवारी सांगितली जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने बघता येईल. विशेष म्हणजे विद्यार्थी आपली मार्कशीटही डाऊनलोड करू शकतात. बारावीचा निकाल अगदी झटपट तुम्ही टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरही बघू शकता.

बारावी परीक्षेचा निकाल तुम्हाला झटपट बघायचा असेल तर तुम्ही www.tv9marathi.com वर हा निकाल आरामात बघू शकता. यासोबतच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वरही तुम्ही निकाल बघू शकता. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आईचे नाव आणि इतर काही माहिती भरावी लागणार आहे.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची मार्कशीट तुमच्या हाती पडेल. यासोबतच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. टीव्ही9 मराठीवर निकाल पाहण्यासाठी www.tv9marathi.com वर भेट द्या. होम पेज किंवा टीव्ही9 मराठी करिअर विभागामध्ये महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2026 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा. किंवा महाराष्ट्र बोर्ड बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तिथे आपला परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती भरा आणि समिट करा. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर समोर असेल. अशा सोप्प्या पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. झटपट तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल. आता निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाचीही तारीख बोर्डाकडून लवकरच जाहीर केली जाऊ शकते.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!