AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Cleaning: घराच्या साफसफाईसाठी तासन्‌तास घालवू नका! दिवाळीआधी एका दिवसात करा संपूर्ण घर चकाचक

दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. सणाच्या तयारीसोबत घराची साफसफाईही करायची आहे, पण वेळ कमी असल्यामुळे धावपळ होत आहे. अशावेळी योग्य नियोजन करून अवघ्या एका दिवसात संपूर्ण घराची स्वच्छता कशी पूर्ण करायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, या टिप्स नक्की उपयोगी पडतील.

Diwali Cleaning: घराच्या साफसफाईसाठी तासन्‌तास घालवू नका! दिवाळीआधी एका दिवसात करा संपूर्ण घर चकाचक
घराच्या साफसफाईसाठी तासन्‌तास घालवू नका! दिवाळीआधी एका दिवसात करा संपूर्ण घर चकाचक
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 12:42 PM
Share

दिवाळीच्या सणासाठी घराघरांत साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र दोन खोल्या, हॉल, किचन आणि बाथरूम अशा सर्व ठिकाणांची स्वच्छता करायची म्हटल्यावर बराच वेळ जातो. अशावेळी योग्य नियोजन केल्यास अवघ्या एका दिवसात संपूर्ण घराची साफसफाई पूर्ण करता येऊ शकते. यासाठी कुठून सुरुवात करावी आणि कमी वेळेत घर स्वच्छ करण्यासाठी काय करावे, जाणून घ्या.

सर्वात आधी पसारा आवरा

दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करण्यापूर्वी घरात विखुरलेल्या वस्तू व्यवस्थित आवरून ठेवा. कपडे, चपला, पुस्तके आणि इतर वस्तू त्यांच्या जागी ठेवा. अनेक दिवसांपासून वापरात नसलेल्या वस्तू वेगळ्या काढा. यामुळे साफसफाई करताना अडथळा येणार नाही आणि वेळेचीही बचत होईल.

दोन्ही बेडरूमची स्वच्छता करा

सर्वप्रथम घरातील दोन्ही बेडरूम स्वच्छ करून घ्या. बेडशीट आणि उशांचे कव्हर बदला. कपाट, टेबल, पंखे, खिडक्या आणि दरवाजांवरील धूळ पुसून काढा. बेड खालील जागा आणि खोलीचे कोपरेही स्वच्छ करा. कपाटातील वस्तू व्यवस्थित लावून शेवटी फरशी पुसून घ्या.

हॉलला द्या नवा लुक

घरात येणाऱ्या पाहुण्यांचे सर्वप्रथम लक्ष हॉलकडे जाते. त्यामुळे हॉलच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. सोफा, कुशन, टेबल आणि टीव्ही कॅबिनेट स्वच्छ पुसून घ्या. मळलेले पडदे धुवून घ्या किंवा बदला. भिंती आणि खिडक्यांवरील धूळ काढा. हॉल अधिक आकर्षक दिसण्यासाठी एखादे छोटे रोप किंवा सजावटीची वस्तू ठेवू शकता.

किचनमधील चिकट तेलकटपणा काढा

घरातील इतर खोल्यांच्या तुलनेत किचन स्वच्छ करणे थोडे अवघड असते. गॅस शेगडी आणि आसपास साचलेला तेलकटपणा आधी स्वच्छ करा. त्यानंतर किचन ओटा, सिंक, टाइल्स आणि कॅबिनेट पुसून घ्या. मसाल्यांचे डबे आणि फ्रिज स्वच्छ करा. एक्सपायरी डेट गेलेले पदार्थ आणि निरुपयोगी डबे बाहेर काढून शेवटी फरशी पुसून घ्या.

बाथरूमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका

खोल्यांच्या साफसफाईसोबत बाथरूम स्वच्छ करणेही आवश्यक आहे. सर्वप्रथम बाथरूममधील रिकामे डबे आणि नको असलेल्या वस्तू बाहेर काढा. टॉयलेट सीट, वॉश बेसिन, नळ आणि शॉवर क्लीनरच्या मदतीने स्वच्छ करा. टाइल्सवर साचलेली घाण ब्रशने काढा. आरसा आणि दरवाजा पुसून शेवटी फरशी स्वच्छ धुऊन कोरडी होऊ द्या.

शेवटी संपूर्ण घराची स्वच्छता करा

सर्व खोल्या, हॉल आणि किचनची स्वच्छता झाल्यानंतर संपूर्ण घरात पुन्हा एकदा झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनर फिरवा. त्यानंतर फरशी पुसून घ्या. दरवाजे आणि खिडक्याही स्वच्छ कापडाने पुसा. घरात ताजी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. साफसफाई पूर्ण झाल्यानंतर रांगोळी, फुले आणि पणत्यांनी घर सजवा.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर