AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातली धक्कादायक घटना, दहावीच्या मुलांकडून 5 ते 8 वी च्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, रेल्वे कॉटेजजवळच्या झुडपात…

या ठिकाणी कोणालाही संशय येणार नाही अशा एकांत जागेचा गैरफायदा घेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वसतिगृहापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे कॉटेजजवळील झाडाझुडपांच्या पडीक जंगलात हा प्रकार सुरु होता.

महाराष्ट्रातली धक्कादायक घटना, दहावीच्या मुलांकडून 5 ते 8 वी च्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार,  रेल्वे कॉटेजजवळच्या झुडपात...
Crime News
| Edited By: | Updated on: Mar 05, 2026 | 11:57 AM
Share

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या नावाखाली अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इगतपुरी पोलिसांनी या प्रकरणी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या याच वसतिगृहात खेड्यापाड्यांतील तसेच आदिवासी वस्त्यांवरील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याच वसतिगृहातील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या माध्यमातून धमकावत वसतिगृहापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे कॉटेजजवळील झाडाझुडपांच्या पडीक जंगलात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नशेची औषधे आणि मद्य देऊन त्यांच्यावर अत्याचार

या ठिकाणी कोणालाही संशय येणार नाही अशा एकांत जागेचा गैरफायदा घेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.लहान विद्यार्थ्यांना धमकावून तसेच नशेची औषधे आणि मद्य देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी अनेक वेळा वसतिगृहातील जबाबदार व्यक्तींना या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर दबाव टाकून गप्प बसवण्यात आल्याचा आरोप देखील पुढे आला आहे.

वसतिगृहाच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा

दरम्यान, वसतिगृहाचे नुकतेच नियुक्त झालेले अधीक्षक सुशांत दूधसाखरे यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इतर सदस्यांचा काही संबंध आहे का?

या संपूर्ण प्रकरणानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून काही महत्त्वाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात संस्थाचालक किंवा इतर सदस्यांचा काही संबंध आहे का तसेच आणखी काही विद्यार्थी या प्रकारात सहभागी आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. इगतपुरी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...