AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं बाथरुम, आतल्या खोलीत काय चाललंय? AI ग्लास सगळं पाहतोय; नव्या माहितीने खळबळ!

सध्या स्मार्ट ग्लासची चर्चा होत आहे. हा स्मार्ट ग्लास डोळ्यावर लावला की सगळं रेकॉर्ड होतं, असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच आता खळबळ उडाली आहे.

तुमचं बाथरुम, आतल्या खोलीत काय चाललंय? AI ग्लास सगळं पाहतोय; नव्या माहितीने खळबळ!
smart glassImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 05, 2026 | 8:05 PM
Share

आजकाल एआयचा विस्तार जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात होत आहे. आरोग्य, उद्योग, शेती अशा सर्वच ठिकाणी एआय वापरले जात आहे. विशेष म्हणजे एआयच्या मदतीने रोज वेगवेगळी उपकरणं बाजारात येत आहेत. काहीही न करता फक्त कमांड देऊन तुम्ही एआयच्या मदतीने तुमची सर्व कामे करू शकता. सध्या मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बाजारात एका प्रतिष्ठित कंपनीने स्मार्ट ग्लासेस बाजारात आणले आहेत. या ग्लासेसच्या मदतीने तुम्ही अनेक कामे करू शकता, असे सांगितले जात आहे. परंतु हाच स्मार्ट ग्लास तुमचे सर्व खासगी क्षणदेखील रेकॉर्ड करत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळेच आता सामान्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सर्व डेटा ह्यूमन मॉडरेटर पाहात आहेत

गेल्या महिन्यात 27 जानेवारी रोजी स्वीडनमध्ये एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात एक रिपोर्ट छापून आला होता. या रिपोर्टमध्ये स्मार्ट ग्लासमुळे तुमचे सर्व खासगी क्षण तुम्हाला माहिती नसतानाही कैद केले जात आहेत, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच हा स्मार्ट ग्लास वापरकर्त्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करून तो सर्व डेटा ट्रेनिंगच्या नावाखाली थेट ह्यूमन मॉडरेटर पाहात आहेत, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

डोळ्यावर ग्लास लावला की..

तुम्ही हा स्मार्ट ग्लास डोळ्यांवर लावला की तुम्हाला माहिती नसतानाही रेकॉर्डिंग सुरू होते. हे सर्व घडत असताना तुम्हाला तसेच तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही त्याची कल्पना नसते. तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने एखादी रेकॉर्डिंग करत असाल तर समोरच्या व्यक्तीला लगेच समजते. परंतु स्मार्ट ग्लास डोळ्यावर लावलेला असेल तर ते कोणालाही समजत नाही. त्याचाच परिणाम म्हणून असे ग्लास लावल्यास तुमच्या इच्छेविरुद्ध किंवा तुम्हाला न समजू देता व्हिडीओ रेकॉर्ड होत आहेत. हा सर्व एआय सिस्टिमला ट्रेन करण्यासाठी वापरला जात असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये व्हिडीओ, टेक्स्ट, फोटो अशा प्रकारचा डेटा आहे.

दरम्यान, आता स्मार्ट ग्लास या एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या गॅझेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...